वैयर्थ जेथे उमगे सदा…

आत्महत्या १

आज बरंचस लिहतोय कारण माझ्या वाचनात आलं, एका ब्लॉगरने केलेल्या आत्महत्येबद्दल…

जिन्दा रहे किस के खातिर, होश में आये किस के लिए

जाने वाले आ नहीं सकते, शम्मे जलाये किस के लिए

मनाच्या तळाशी लपलेल्या नकारात्मक भावनांचे दृश्य जगतातले भीषण वास्तव- आत्महत्या..

कारण काहीही असो, पण परिणाम एकच होतो..आयुष्य संपते आपल्या हातानेच, आपणच कठोर होतो आपल्यावर.. मला तर वाटते की आत्महत्या करणारा हा एक प्रवासच करत असतो आणि तो ज्या क्षणी मरणापर्यंत पोहचतो तेव्हा तिथे त्याला आणखी करण्याजोगे काही राहत नाही. ‘विहीर’ चित्रपट कालच पाहिला, त्यात दोन भावंडांचे मनोविश्व चित्रित केले आहे.. मोठा असलेला मावसभाऊ अचानक जग सोडून जातो, मग या आपल्या जवळकीच्या असलेल्या नात्यात उलथापालथ जाणवत राहते याच सुरेख रेखाटन केलं आहे यात. हा नच्यादादा काहीसा विरक्त मनाचा, जीवनाचे मुलभूत प्रश्न  सोडवणारा दाखवलेला आहे.. तो स्वत:हून आपल्या सम्याला सांगतो की मला अदृश्य व्हायचं आहे.. मी जाणार आहे; सर्वांपासून, रक्त्याच्या नात्यांपासून  दूर.. इथेच लक्षात येत की तो आपल्या प्रवासाला (आत्महत्याच्या !) निघाला आहे.. हे जड वास्तव समीरला खूप घाबरवतं, नचीकेतला काय झाल? तो कुठे जाणार? हे प्रश्न समीरला घोंघावू लागतात.. नंतर नचीकेतचा समीर नसतांना मृत्यू होतो. मग समीरला अजून नचीकेतला काय झाल होत?तो कुठे गेला? मला सांगितलं त्याप्रमाणे तो अदृश्य तर नाही नं झाला? असे  प्रश्न पडू लागतात. चित्रपटात तसे स्पष्टपणे नाही दाखवले की नचिकेत अपघाताने मरण पावतो, की त्यामागे आत्महत्या असावी. काहीसा संदिग्ध पण मनाला स्पर्शून जाणारा चित्रपट आणि पुढच्याच दिवशी ही आत्महत्येबद्दलची बातमी.. यांमुळे माझ्या मनात तर खूप संदर्भरहित कल्लोळ उठायला लागलेत.. म्हणून हा पोस्ट प्रपंच..

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s