वैयर्थ जेथे उमगे सदा…

अक्षय्य तृतीया

च्यामारी ही काय भानगड.. १५ दिवसांपासून अभ्यासाची खटपट करणारा, डिप्रेस्ड प्राणी आता एका सणावर लिहणार.. बरोबर इस्टर संडेला हा ब्लॉग सुरु करण्यात आला असून मी कोणत्या विषयावर विशेषत: सणावर कधी ही (नाही, त्याच दिवशी) लिहू शकतो.. अभ्यास आहेच हो..कधी ना कधी संपणार आहे, पण सण आलेत..आणि येतील..

खर तर मला या अक्षय्य तृतीयेशी काही सोयरसुतक नाही..; पण काही कारणाने मला जर उबग आला तर इथे लिहायला विषय शोधावा लागतो आणि आज तर त्याची गरजच नाही. काय असेल अक्षय्य तृतीयेचे महत्त्व? नावात तर अक्षय्य आहे म्हणजे काही पुराण-प्रचीत असेल अथवा नसेलही कारण ‘अक्षय्य’ हे नावचं मुळी डिबेटेबल आहे, अस की अक्षय अस या जगात काही नाही आणि हे जग अक्षय अश्या संकल्पनेपासून बनलेले आहे अस म्हणतात… म्हणजे काय?

असो,.अक्षय* हे नाऊन (नाम) आहे, तर अक्षय्य हे त्याचे विशेषनाम (अद्जेक्तीव्ह)..हम्म एवढ तर मला कळू शकते. पुढे आहे ‘तृतीया’ म्हणजे चंद्र-कालगणनेची तिसरी तिथी अथवा दिवस-रात्र.. हे ही समजू शकते. हे नावाच्या मुळात घुसणे काय चालू आहे माझे, विकीला तर सर्व मिळेल.. पण इथे मी माझ्यावरचेच विश्लेषण करत असताना अक्षय्य तृतीया या सणाचा उल्लेख करतोय.. माझ्या मनांगणात उमटलेले या सणांचे शिंपडे इथे मला सांगायचे आहेत.हा सण भर वैशाख-उन्हांत येतो…तो तसा एकमेव असावा.,तसा चैत्र पाडवा ही येतो पण तेव्हा रणरणते उन नसते. काहिली होते ती वैशाखातच..या नंतर आपले पावसाळी सण सुरु होतात.. सुरु काय चांगली भरभराट असते सणांची तेव्हा. हाच एक-एकटा गिरका घेणारा वैशाखातल्या ढगासारखा सण आहे. याने अक्षय्य अशी सुखे लाभतात तरी, कशी मग? या पॉईन्टला सुरु झालेले कार्य अक्षय राहते. विसंगती आहे थोडी..(अगेन डिबेटेबल)

बर बर जास्त पकवत नाही.. या ज्यास्ती डोक्य लावयाची माझ्यात लक्षणं तेव्हा येतात.. जेव्हा मी ‘अक्षय्य’ अश्या अभ्यासाला लागतो.

*अक्षय कुमार हे हिंदी चित्रपटांमधले कुणी आहेत, म्हणतात…

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s