वैयर्थ जेथे उमगे सदा…

कन्सेप्ट्स १

आजचा धरून ७ दिवस बाकी आहेत परीक्षेला..

तर, अकौनत्सच्या दोन कन्सेप्ट्स इथे शेअर करतोय..

१. कॉनसोलीडेटेड स्तेमेंत्स मध्ये गुडविल आणि कॅपिटल रिझर्व काढायचे असते आणि ते अनुक्रमे असे काढतात, जर कॉस्ट (मार्केट) व्हेल्यू > पेड अप व्हेल्यू असेल तर आणि व्हाईस वर्सा, कॉस्ट (मार्केट) व्हेल्यू < पेड अप व्हेल्यू असेल तर… याचा अर्थ काय की आपण होल्डिंग कॅ. आहोत, असा विचार केला असता सब्सिदिअरि कॅ. मध्ये ज्या किंमतीने होल्डिंग होण्याआधी गुंतवणूक खरेदी केली असते ती,  आपल्या अस्सेत्स साईडला असते, नंतर कालांतराने होल्डिंग झाल्यावर सब्सिदिअरि कॅ. ची नोमिनल कॅपिटलची किंमत ग्राह्य धरून वजावट करावी लागते, याकरता की गुंतवणूकच्या किंमतीचा डबल इफेक्ट नको व्ह्यायला.. मग पुढे ऑलरेडी अस्सेत्स साईडला असलेल्या गुंतवणूकची किंमत नोमिनल कॅपिटलपेक्षा (पेड अप व्हेल्यू) अधिक असेल तर तो फरक परत अस्सेत्स साईडला दिसायला हवा..म्हणून तो फरक गुडविल म्हणून दाखवतात. आणि, याच्या उलट जर गुंतवणूकची किंमत नोमिनल कॅपिटलपेक्षा (पेड अप व्हेल्यू) कमी भरली तर, लायबल्तीज साईड जास्त भरते असा त्याचा अर्थ निघतो.. म्हणून तो फरक लायबल्तीज साईडलाच कॅपिटल रिझर्व म्हणून दाखवला जातो.

२. या गुडविल आणि कॅपिटल रिझर्व काढण्याची कटकट आणखी एकात आहे ती म्हणजे अमल्ग्मेशन/मर्जर/अब्सोर्पशन/अक्विजीशन यांमध्ये.. या चारींसाठी गोंडस नाव आहे कॉर्परेत रिस्त्रकच्रिंग.. यात मुख्यत: अमल्ग्मेशन मध्ये वरील दोन जीवांचे (एक काढला, तर दुसरा काढावा लागत नाही) कॅलक्युलेशन असते. अमल्ग्मेशनमध्येही आणखी दोन फाटे फुटतात आणि ते; परचेस आणि मर्जर असे आहेत..पण हे आहेत थेरोतीकल, म्हणजेच की काही अटी नियम पूर्ण करून अमल्ग्मेशन स्कीम लॉ रेग्युलेशन कडून अप्रूव करून घेणे. याच्याशी आपल्याला काही घेण-देण नाही. तर अमल्ग्मेशनच्या अकौनटिंगसाठी दोन प्रक्टिकल फरक केले आहेत..ते; एक पुलिंग इंटरेस्ट मेथड आणि दोन परचेस मेथड (पुन्हा, ‘परचेस’).. तर यात फक्त आणि फक्त परचेस मेथडमध्येच गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व काढला जाऊ शकतो. म्हणजे पाहिलं नं, या अमल्ग्मेशन प्रकारात ‘डोंगर पोखरून उंदीर निघाला’…  तर त्याचे स्पष्टीकरण असे की,

गुडविल = परचेस कन्सिदरेशन > नेट अस्सेत्स आणि,

कॅपिटल रिझर्व = परचेस कन्सिदरेशन < नेट अस्सेत्स.. हे अस का की, जेव्हा त्रांस्फरर कॅ. ला जेव्हा त्रांस्फ्री कॅ. परचेस कन्सिदरेशन देताना त्रांस्फरर कॅ.च्या नेट अस्सेत्सपेक्षा जास्त देते तर तेव्हा त्रांस्फ्री कॅ. त्रांस्फरर कॅ.च्या गुडविलची किंमत अदा करत असते, थोडक्यात काय तर त्रांस्फरर कॅ. चे मार्केटमधील गुडविल (इनत्नजीबल असेट) विकत घेते.. तीच ती नेट अस्सेत्सपेक्षा जास्तीची रक्कम असते. याच्या उलट जेव्हा त्रांस्फ्री कॅ. त्रांस्फरर कॅ.च्या नेट अस्सेत्सहून कमी रक्कम त्रांस्फरर कॅ. ला देते, तेव्हा त्रांस्फ्री कॅ. आपला या कॅ. खरेदी व्यवहारातून प्रोफिट नोंदवते…अर्थात तो कॅपिटल प्रोफिट असल्याने तो कॅपिटल रिझर्वला टाकावा लागतो.

 

महत्त्वपूर्ण सूचना – वरील वाचताना कॉमर्स फिल्डचे विशेषत: अकौनत्सचे नसाल, तर ते शब्द वाचून डोक फिरलं तर मी जबाबदार नाही…

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s