वैयर्थ जेथे उमगे सदा…

कन्सेप्ट्स २

आता स्त्रतेजिक मनजेमेंत (एस.एफ.एम.)चा पार्ट बघूया..छोट्या छोट्या पण मस्त मस्त संकल्पना आहेत या विषयात..हा विषय म्हणजे भांडवली उपाययोजना, किंमत ठरवणे…अश्या आशयाचा आहे..

  १. स्वाप हा प्रकार किती जणांना माहित आहे, माहित नाही..पण ज्यांना माहित आहे त्यांच्यासाठीच लिहितोय, तर स्वाप अनेक व्यवहारांच्या प्रकारांमध्ये होऊ शकतो. माझा मुद्दा फक्त इंटरेस्ट रेट (इं. रे.) स्वाप बद्दल आहे, या स्वाप मध्ये फिक्स्ड इं. रे. आणि फ्लोटिंग इं. रे. यांचे स्वापिंग होते. दोन पार्टीज आप-आपल्या उद्देश्यानुसार ऋणावर असणारे फिक्स्ड अथवा फ्लोटिंग रेट्ज निवडतात, आणि नेमक्या उलट्या रेट्जनी मार्केटमध्ये ऋण घेतात. मग, जो फिक्स्ड रेटने स्वाप मध्ये बांधील आहे तो फ्लोटिंग रेटने  रक्कम बाजारातून ऋणावर घेतो आणि त्याच्या विरुद्ध असलेली को-पार्टी बाजारातून फिक्स्ड रेटने रक्कम ऋणावर घेते. आता पुढे कॅल्क्युलेशनचा भाग आहे..

  1. सर्वात पहिले दोघां पार्टीजना लागू असलेले फिक्स्ड रेट्ज आणि फ्लोटिंग रेट्ज विचारात घ्या.
  2. दोन फिक्स्ड रेट्ज मधला फरक काढा, तसाच दोन फ्लोटिंग रेट्ज मधला फरक काढा, आणि या दोन फरकांचाही फरक काढल्यावर त्याला नेट गेन म्हणतात.
  3. हा नेट गेन दोघां पार्टीजना समप्रमाणात विभागून घ्या. इथे मी इंटरमीडीयरी बँकचा विचार करत नाहीये..म्हणून हा फरकांमधला नफा (फरक) प्रत्यक्षपणे को-पार्टीज शेअर करतील.
  4. यानंतर तो विभागलेला नफा आप-आपल्या उद्देश्य (फिक्स्ड/फ्लोटिंग) रेटमधून वजा करायचा..आणि उरलेला निव्वळ रेट असेल तो पार्टीजना खराखुरा इंटरेस्ट रेट असेल (आप-आपल्या उद्देश्य रेटनुसार).
  5. वरच्या ४ स्टेप्स तर कुणीही करू शकतील, पण पुढे काहीजण बिथरू लागतात.. इथून खर या स्वापचे अप्लिकेशन असते..आणि ते कुणी कुठे नीटपणे सांगत नाही. जाऊ द्या, मी सांगतो, आता जी फिक्स्ड रेटवाली पार्टी आहे, त्याच्या निव्वळ उरलेल्या रेटमधून (अर्थात, फिक्स्ड रेट वजा दिव्हाय्देड नेट गेन) आणखी एकदा तो तिच्यावाटचा दिव्हाय्देड नेट गेन वजा करायचा, आणि..तो जो रेट येईल त्या रेटने ती फिक्स्ड रेटवाली पार्टी समोरच्या पार्टीला पेमेंट करेल..
  6. यानंतर, फिक्स्ड रेटवाल्या पार्टीचा एकूण आउट फ्लो काढायचा..म्हणजेच त्याने बाहेर मार्केटमध्ये फ्लोटिंग रेटने केलेले पेमेंट अधिक आता काढलेल्या रेटने को-पार्टीला केले पेमेंट, हा झाला टोटल आउट फ्लो..यातून त्याचा तो खराखुरा इंटरेस्ट रेट (निव्वळ उरलेला रेट) वजा करायचा आणि जे उत्तर येईल त्या रेटने ती फिक्स्ड रेटवाली पार्टी फ्लोटिंग रेटवाल्या पार्टी कडून पेमेंट स्वीकारेल (रिसीट करेल-नेट इन फ्लो).
  7. हुश्श..आताशी एक भाग पूर्ण झाला.. यानंतर फ्लोटिंग रेटवाल्याकडे वळायच, याच्या खात्यात आता आपल्याकडे एक; मार्केटमध्ये फिक्स्ड रेटप्रमाणे केलेले पेमेंट, दोन; फिक्स्ड रेटवाल्या पार्टीला केलेले पेमेंट (वर मध्ये काढल्याप्रमाणे), आणि तीन; फिक्स्ड रेटवाल्याकडून मिळालेली रक्कम (वर ५ मध्ये काढल्याप्रमाणे) आहे… आता यांची विभागणी टोटल आउट फ्लो आणि नेट इन फ्लो यांमध्ये होईल, आणि त्यांच्या बेरीज-वजाबाकीतून जो रेट येईल तो या फ्लोटिंग रेट वाल्या पार्टीचा खराखुरा इंटरेस्ट रेट (निव्वळ उरलेला रेट) असायला हवा.. मगच आपल स्वापिंग बरोबर आहे असं म्हणता येईल.. ही फाईल बघू शकता..पडताळणीसाठी swap

२. दुसरी कन्सेप्ट अशी आहे की मी आता अभ्यासाला लागलं पाहिजे… नाहीतर मी या स्वापमध्ये पी.एच.डी घेण्यालायक बनून जाईन…

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s