वैयर्थ जेथे उमगे सदा…

न पडणारे प्रश्न

आज काय लिहू काही कळत नाही. उद्या लिहायला असेल, बरेच काही; तरी बोलतो मनात असलेले.. कोकीळ सुरेख कुहूकुहू करतोय (करतेय).. भर दुपारी ३ ची वेळ.. वारा सुसाट सुटलाय, सुंसू (हुउहू) आवाज करतोय.. काल-परवाच थोडा पाऊस पडून गेला..पण आज त्याचे नाममात्र चिन्ह नाही.

अश्याच एका अश्विन-कार्तिकातल्या दुपारी ३ च्या आसपास माझा जन्म झाला, असं म्हणतात (ब्लॉगचा नाही, तर चालता फिरता ‘मी’चा). १० मिनिटांत बिनदिक्कत मी मोकळा झालो (विनात्रास, सुखरूप झाल्याने, आमच्या आईचे विधान). या सर्व गोष्टींचा काहीच संदर्भ राहत नाही, आयुष्यात पुढे…पण, या ना त्या कारणाने ही गोष्ट सर्वांपुढे सांगितली जाते..आणि इथेही मी तेच करतोय, असो.

यालाच म्हणावे का.., जन्मकारण..जन्माची वेळ, तारीख-वार, नक्षत्र, राशी…इत्यादी इत्यादी बघणे आणि त्यावर भाष्य करणे..

आपल्या पृथ्वीचे जन्मकारण बघणे कठीणच, पण मग आपण पृथ्वीची मरणाची वेळ का निश्चित करावी, असा ग्लोबल प्रश्न मला लगेच पडला… बर असो, असा मला पावसासारखा पडलेला प्रश्न आणि तसल्याच पद्धतीने एखादा दुर्मिळ प्रश्न जर उद्याच्या कॉस्टिंगच्या पेपर मध्ये नाही पडला तर सर्व मिळवले..

Advertisements

One response

  1. पिंगबॅक दुरितांचे तिमिर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s