वैयर्थ जेथे उमगे सदा…

मना रे जनीं मौनमुद्रा धरावी

कथा आदरे राघवाची करावी

नसें राम ते धाम सोडूनि द्यावे

सुखालागिं आरण्य सेवीत जावे

समर्थ रामदास अगदी अचूक वर्णन करण्यात अचूक राहिले आहेत. भोगाची (म्हणजे कसली) समाधी (!!!!!!!!) नसल्यावर विरक्तीचे गान गाण्यात धन्यता मानणे, असे आद्य कर्तव्य असलेल्या मानवजातीला समर्थ रामदास, हे उद्देशून सांगतात.

       मुळात जाऊन असं म्हणता येईल, आपला समाज चित्र-विचित्र जंजाळाने वेढला आहे… हजारो नव-नवीन कल्पना-संकल्पना येतात-जातात.. एकेकाची आपल्या आत गुरफटत जाणारी स्वतंत्र मालिका आयुष्यभर चालू असते.., त्यात कधी ते आयुष्य संपून जाते आणि त्याच्या अस्तित्वात असण्याबद्दलचे प्रश्नचिन्ह उभे राहतात. आपले या सर्वांत मन गुंतवून निष्फळ वायचाळा सुरु राहतो.. म्हणून मग ते गुंतलेले मन दुष्करीत (म्हणजे काय रे!) करून एक स्वतंत्र मार्ग निवडायचा, शांत राहायचे, निरीक्षण करत जायचे.. येणारे क्षण जवळून बघायचे आणि कामाची (झालेली- चालू- होणारी) क्षुल्लक चिंता सोडून द्यायची… सुख पकडणारे न बनता..सुखानिराळे जगून पाहण्यात आणि खरे सुख नाहीच काही, ही जाणीव येण्यात आपण तत्परता दाखवावी,… सेवीत जाणे – सेवा करणे.. आरण्याची सेवा करणे (अशक्यच!), ह्या मागे असलेला मथितार्थ असा, एकटे राहून मनन करणे.. एकटे राहणे केवळ अरण्यात शक्य आहे, कारण मनाची अवस्था अरण्यात अंतर्मुख बनू लागते.. आपल्याच हृदयाचे ठोके आपल्याला अरण्यात जवळून ऐकायला मिळतात..निष्कारणत्वाचा (जगाच्या!) अर्थ आपण शोधू लागतो तिथेच.. इतकंच काय अरण्य या शब्दाचा अर्थ मागे कुठेसा वाचला तेव्हा असे लक्षात आले कि, रण (युद्ध,याअर्थी) नसलेले क्षेत्र, म्हणजेच भांडण, वाद-विवादरहित जागा.. हिंस्र प्राणीही जिथे आरण्यवास करतात, ती जागा समर्थांना अपेक्षित आहे. मनाचे श्लोक मध्ये समर्थांनी वेळोवेळी आरण्याला सेवीत जावे, म्हटले आहे… याबद्दल आपण जरा शांतपणाने निरीक्षण करून, विचार करीत एकांत गाठावा.

क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे

न लिंपे कदा दंभ वादे विवादे

करी सुखसंवाद जो उगमाचा

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s