वैयर्थ जेथे उमगे सदा…

वो किस्सा सुनाने कि आदत पुरानी..

एवढ भलमोठ्ठ शीर्षकाखाली मी काही अर्थपूर्ण लिहिणार असं काही नाही.. माणसाची सवय असते, दिवसाची सुरुवात झाली कि जी किस्सांनी सुरु होते ती संपतानाही जपली जाते. माझ्या घरी जर वयोवृध्द ओळखीचे गृहस्थ आपला (!) वेळ घालवण्यासाठी आलेत तर मी आपला नमस्कार चमत्कार करून आतल्या खोलींत लपून जातो. बाकी, मग घरचे असतात त्यांना खातीरदारीसाठी, मला ते निघून जावोस्तर कसनुसं होत असतं. यासाठीच कि, मला ते कधी बोलवतील आणि चौकशी करायला लागतील.. पण तशी वेळ जर आली नाही तर मी सुटकेचा निश्वास टाकतो. असो. तर सांगायचं असं कि आपले सो कॉल्ड वयोवृद्ध आपले किस्से सांगतात आणि आपले मन मोकळे करण्यात यशस्वी होतात. पण यानंतर मला त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्याच किस्सांची सारखी सारखी (असं मला कदाचित वाटत राहतं, पण तसं नसावं) उजळणी माझ्या आईकडून होत असते… एवढंच नाही तर, त्यासोबत किस्सांशी रिलेटेड तिचे किस्से ऐकायला लागतात. ही किस्सांची मालिका समाप्त होते ती जोवर मी माझा एखादा किस्सा आईशी शेअर करत नाही तोवर… मला तर असं वाटत की, आईला माझ्याकडून डायरेक्ट असे अनुभव शेअरिंग होत नसल्यामुळे अश्या इन-डायरेक्ट पद्धतीने ती मला बोलायला लावते. जे काही असो, पण मी माझी प्रायव्हसी सो कॉल्ड स्पेस जपण्यात अयशस्वी होत असतो.. ही झाली माझ्या तक्रारीची बाजू, तशीच आईच्या चिंतेत जाणारी बाजू म्हणजे तिला मी घुमा-एकलकोंडा-काहीही न सांगणारा-काही काही (!) लपून ठेवणारा असा वाटतो. या निकषांवर मी घुसमटून जातोय.. आजही असं झालं पण मला हे नेहमीसारखे वाटले नाही.. आज मी कोणताही किस्सा शेवटी सांगितला नाही आणि आईनेही किस्सांची मालिकाही बनवली नाही, उलट आज आलेल्या त्या वयोवृद्धांच्या किस्साची आटोपशीर भाषेत मला बतावणी करण्यात आली. कारणं  मी शोधतोय, ती अशी असतील..

एक- आईची तब्येत व्यवस्थित नसल्याने आईला त्या गोष्टींत उत्साह वाटला नसेल.

दोन- मी घरात जरा बोलूनचालून (असं आईला वाटत आहे) राहतोय..घरी काही कारण न सांगता बाहेर जात नाहीये.. म्हणजेच काही सांगून जात नाही, अशी तक्रार आईला करायला मिळाली नाही गेल्या पंधरा दिवसात…

तीन- घरातली बाहेरची कामे मी यशस्वीपणे केलीत.

अजून काही असेल तर मी त्याचा शोध घेतोय.. पण मला आईला म्हणावंस वाटत.. मी काय लपवणार तुझ्यापासून, मी तुझाच मुलगा आहे माझा कण न् कण तुझ्यामुळे आहे.. तुला माझ्यात काही लपलेले काही वाटत असेल तर तो नक्कीच तुझा भ्रम नाही, रास्त आणि खरा ठरणारा संशय आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s