वैयर्थ जेथे उमगे सदा…

मिळवणूक

हा शब्द पिळवणूकटाईप आहे ना… आणि तो सहसा वापरला जात नाही. हात-मिळवणी असा शब्द आपण बोलतो, पण मिळवणूक फारच कमी.. कोणत्या दोन गोष्टी जुळवण्या-मिळवण्याबद्दल बोलायचे असल्यास जुळवणूक आणि मिळवणूक असे संदर्भ-सुसंगत शब्द आहेत. परंतु, मी इथे माझ्या जीवनातल्या मिळवलेल्या गोष्टी, प्रसंग, अनुभव क्वचित ठिकाणी शिकवण या संदर्भासाठी हा शब्द योजतो आहे. म्हणायचे झाल्यास, आयुष्यभर आपण काहीनकाही मिळवतच असतो..म्हणजे झालीच ना आपली मिळवणूक आपल्याच जीवनाशी..बर हा फाफट-पसारा पुरे..

योग्य वेळी योग्य करण्यात मला समाधान लाभते..ते मिळवण्याचा मी प्रयत्न करतो आणि त्या अनुषंगाने मी तसा वागतोयही, त्या वागण्याने मला सीए अंतिम चरणापर्यंत तर पोहचवले.. ते चरण पूर्ण केले तर माझ्या घरात मी चरण पडण्यालायक बनेल.. आणि तसे नाही झाले तर मला इतर कोणाचे चरण पडण्यालायक बनावे लागेल, असो..तो मुद्दा वेगळा आहे. एम बी ए प्रवेश प्रकियेत माझ्या प्रवेशाच्या अश्याच मिळवणुकीसंदर्भात मला सांगता येईल की योग्य वेळी योग्य फळ पटकन आपल्या पदरात पाडून घ्यावे..अन्यथा अन्यजण आपल्याला पाडण्यात प्रवेशपात्र ठरतात, असो.

  आणखी बरेचसे अगदी छोटे-अधिक मिळवणूक सांगण्यात वेळ नको घालवायला कारण, कोणत्या मिळवणुकीची योग्य वेळ कधी येते आणि त्याकरिता आपण सज्ज कसे राहतो हे बघणे अधिक योग्य ठरेल.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s