वैयर्थ जेथे उमगे सदा…

धास्तीची भिस्त

आज मला ज्या भयसूचक गोष्टी वाटतात, त्याबद्दल बोलणार आहे.. मला साप या प्राण्याबद्दल प्रचंड नाही पण जरा भय वाटते. त्यानंतर नैसर्गिक आपत्ती उदा. पूर, भूकंप, प्रलय असे काही याबद्दलही भय वाटते.. अजून काय आहे बरं.. असो, या भयवाचक पदार्थांना धास्ती नावाची संज्ञा आहे आणि त्याहीपुढे, भयाचे असणारे सावट आपण पुरेपूर आपल्या जीवनात उतरवून घेतले तर ती होते भिस्त.. बरोबर कि नाही..

मागे मी काही शब्द वाचले होते, आधिभौतिक-आधिदैविक आणि आधिलौकिक असे. या शब्दांचे भयाशी, दु:खाशी काय संबंध आहे ते मला माहित नाही पण भय-आपत्ती-दु:खाला या शब्दांद्वारे वर्गीकृत केले आहे. भौतिक होणारे म्हणजे नैसर्गिक वगैरे, दैविक अर्थातच जे आपल्या हातात नाही आणि जो कोणी रिस्पोन्स्बिलीटी घेत नाही तर, ती देवाच्या नावावर करायची आख्यायिका आणि शेवटी लौकिक या अर्थी की जी लोकांनी निर्मित केलेली अशी असावी, या बाबतीत मी जरा साशंक आहे पण भयभीत नाही…

याही नंतर असे भय काही उरत नाही, तरी मनात असलेले भीतीचे भूत हे काही खास खाजगी आहे.. ते वर उल्लेखिले नाहीये.. म्हणजेच सार्वजनिक भीतीचे आपण ऑब्स्युलेटली काही प्रकार पडू शकतो पण मानसिक अर्थातच वैयक्तिक स्वरूपाच्या भीतीला, जी रिलेटीव्ह आहे, तिला वर्गीकृत करु शकत नाही. मानसोपचार तज्ञ, मानसशास्त्रज्ञ हे सारे या मनाच्या भितीमागेच तर पळतात, असे मला वाटते. तरी बरे, भितीपलीकडे या मनाला इतरही रोग जडतात. मनाचा ठाव जर घेतला तर, या मनातल्या भितीमागे काय लपलंय हेही कळू शकेल. भूतकाळातले प्रसंग आठवून निर्माण होणारी भीती, भविष्याबद्दलची भीती आणि याशिवाय काही क्षुल्लक कारणासाठीची भीती ह्यानेच मन भीतीने व्यापले जाते, असे मला वाटते.

  “असे मला वाटते.” या सफिक्सखाली मी काहीहि लिहू लागलो तर तुम्हाला भीती वाटायचे कारण नाही, एवढं बोलून मी भीती* (भयापासून मी कधी भीतीवर आलो, हे मला सुद्धा कळले नाही) घालवण्यासाठी काही उपाय करायला निघतो.

*भीती ही संकल्पना आपण बहुतेक मनात वाटणार्‍या भयाबद्दल वापरतो, आणि भय हा व्यापक शब्द इतर सर्व भितींबाबत (जी मनात वाटत नाही, ती) वापरतो.., “असे मला वाटते.”  

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s