वैयर्थ जेथे उमगे सदा…

अखेर पावसास सुरवात झाली..

माझ्या शहरात तरी पाऊस दाखल झाला आहे. त्याबद्दल कोणाची काही हरकत नाही, पण पाऊस आलाच नसता तर सर्वांनी हरकती काढल्या असत्या. सुरुवातीचा पाऊस कधीही वैतागवाणा वाटत नाही किंबहुना तसा तो असतही नाही. पावसाचे मराठी महिने चार, बरोबर त्या चार महिन्याप्रमाणे पाऊस आपले रूप आपल्याला दाखवत असतो, याच्या उलट असे म्हणणे योग्य राहील कि, पावसाच्या चार भिन्न रूपांना बघून हे मराठी चार महिने ठरले असावे.

१ ज्येष्ठ, वाकुल्या दाखवणारा पाऊस….

२ आषाढ, धडकी भरल्यागत पडणारा पाऊस…

३ श्रावण, ऊन-सावलांचा खेळ खेळणारा हलक्या सरींचा पाऊस..

४ भाद्रपद, उरलं-सुरलं सांडणारा भदभदणारा पाऊस…. असे रूपं मला तरी पावसाळ्याच्या चार महिन्यात दिसतात. अश्विन-कार्तिकात आकस्मिक परंतु चमत्कारिक रीतीने पडणारा पाऊस मला खरंच दैवी असा काही वाटतो.

पावसाच्या या वातावरणाला कवित्वाचे लेणं लाभलेले आहे, अगदी संस्कृतच्या काळापासून महाकवी कालिदासाने हे सिद्ध केलंय..

मागणे जीवनाचे पुरे करितो

जाउळ गर्भीचे दशदिशा अर्पितो…

या कस-कश्या दोन ओळी माझ्याकडून येणार्‍या काव्यबहरासाठी..

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s