सौंदर्याची सचोटी..

आज कालिदास दिन आणि मी त्यावर पोस्ट लिहू म्हटलं तर आधीच राज याने त्यावर लिहून ठेवले, आणि तेही सौंदर्याचा कस लावून.. सौंदर्य याअर्थी कि ज्या अनुभवातून, प्रसंगातून प्रवास घडतो तिथल्या सौंदर्याची स्थळे परिपूर्णरीत्या उलगडून दाखवावे, लगेच त्या संदर्भातली चिकित्सा मांडावी याइतपत.. खरंच अप्रतिम विश्लेषण आहे आजंच.. प्रामाणिकपणे मी म्हणू शकतो कि, असे लिहिणे मला तरी जमणे शक्य नाही, किती तो अभ्यास आणि व्यासंग..

बरे, मला सांगायचा मुद्दा हा कि, कालिदासस्य दिनम् याचे औचित्य ध्यानात घ्यायला हवे.. पावसाचा आषाढ महिना..आणि याच महिन्यात मान्सून भारतरात सर्वदूर पोहचतो आणि आपले अस्तित्व दाखवतो. कालिदासाने यालाच मेघदूत असे नाव दिले आहे, आणि सुंदर काव्याची निर्मिती केली. आणखी, आजपासून दक्षिण अयन सुरु होते, म्हणजेच दिवस लहान-लहान होत जाणार.. मेघांच्या गर्द छायेत रात्रीचा अंधारही वाढू लागणार, तो आजपासूनच..

सध्या तुकाराम हा चित्रपट पहिला आणि तेही दोनदा, सांगायचे असे काही त्याबद्दल फार थोडे तरी मार्मिक आहे, बरंच घडत जाणारे प्रसंग जरासेच आशयघन वाटले.. अभिनय करणारे विचारपूर्वक कलेला सादर करणारे वाटले.. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो टिपिकल कमर्शियल ड्रामा वाटला. या चित्रपटाबद्दलही एका ब्लॉगरने उत्कृष्ठरित्या लिहिलंय.. सचिन परब यांनी.

आजचे माझे घनीभूत (मान्सूनच्या घनांची कृपा) झालेले शब्द या दोन ब्लॉगर्सच्या प्रेरणेवरून.. तेवढीच मनातली खळबळ उतरवण्याचे मला समाधान.. आपण ह्या दोन पोस्ट्स जरूर वाचा..

जाता जाता राजने त्याच्या वरील पोस्टवर फैझ यांच्या ओळी दिल्या त्या परत इथे देतो…

आए कुछ अब्र कुछ शराब आए
उसके बाद आए जो अज़ाब आए

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s