वैयर्थ जेथे उमगे सदा…

होत असं कधी कधी… होतेई

दूर अनोळख्या गावात संध्याकाळच्या वेळेस टीमटीमणारा ट्युबलाईट कितीतरी वेळ नुसता झगझगत असतो..त्याच संधीप्रकाशात वर आकाशात वेडावला पक्षी दिशाहीन उडत रहात असतो.. वारा नेईल तसे  पंख फडफडवत असतो.. त्याची काळी आकृती सूर्यास्ताच्या रंगभरल्या अवकाशात तरंगत असते.

झेन तत्त्वज्ञानाच्या कथा आठवू लागतात..

हसरा बुद्ध म्हणून अमेरिकेच्या चायना टाऊनमधील दुकानाच्या गल्लीत प्रसिद्ध असणारा पुतळा.. प्रत्येक दुकानात मोठ्या दिमाखात निरनिराळ्या रुपात उभा असणारा.. तो एक झेन तत्त्वज्ञानी होता. ना त्याने कधी आपल्या भोवती शिष्यांचा गराडा तयार केला आणि नाही त्याने कधी व्याख्याने दिलीत. तो केवळ आपल्या पाठीवर एक लहान पोतडी घेऊन या गावातून त्या गावात फिरायचा आणि त्याच्या या मार्गक्रमणेत गावातल्या खेळणार्‍या लहान-लहान मुलांना आपल्या पोतडीतून फळे, कॅन्डीज्, खेळवस्तू आणि भेटवस्तू द्यायचा. त्याचबरोबर तो त्यांच्याशी खेळायचा, गप्पा गोष्टी करायचा, रिझवायचा..त्यांच्यासाठी एक मनोरंजन केंद्र होऊन जायचा, बस्स…

जेव्हा कधी त्याची झेन तत्त्वज्ञांशी भेट व्ह्यायची तेव्हा त्यांना तो म्हणत असे कि मला एक नाणे द्या आणि तसेच जर त्याला कोणी म्हणत कि तू मंदिरात लोकांना मार्गदर्शनपर व्याख्यान द्यायला जा तर परत त्यांना तो म्हणत असे, मला एक नाणे द्या..

एकदा तो मुलांसाठी आपला खेळ-प्रकार सादर करण्याच्या तयारीत असतांना आणखी एक झेन मास्टर समोर आला आणि विचारलं गेलं “‘झेन’चा गुणधर्म काय आहे?” मग त्याने त्यावर आपली पोतडी खाली जमिनीवर ठेवत मूक उत्तर दिले.

“मग” त्या दुसर्‍याने विचारले, “‘झेन’चे खरे मर्म काय आहे? नक्की काय आहे ‘झेन’?”

पुन्हा एकदा हसर्‍या बुद्धाने आपली पोतडी उचलून खांद्यावर झेलली आणि तो मार्गस्थ झाला.

ह्याच हसर्‍या बुद्धाचे म्हणजे होतेई याचे वास्तव्य तआंग साम्राज्यात होते, तो सुखी चीनी मनुष्य म्हणूनही ओळखला जातो.

Advertisements

One response

  1. तुम्हांला खो दिलाय, घ्या. 🙂
    खपाऊ पण पकाऊ पुस्तकं (http://meghanabhuskute.blogspot.in/2012/06/blog-post_24.html )

    जून 24, 2012 येथे 11:48 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s