वैयर्थ जेथे उमगे सदा…

एका ब्लॉगियाने..

एक-दोन दिवसांपासून रेषेवरची अक्षरे २०११ ह्या दिवाळी अंकातील विशेष विभाग ‘लैंगिकता आणि मी’ वाचतोय. विचार करत राहतोय त्यात लिहलेल्या लेखांबद्दल.. त्या ब्लॉगर्स लोकांचे आभार कि मला इतके उत्कृष्ठ वाचायला मिळाले, जितके जीवनातले प्रसंग एक्स्पोलर करू शकतो तितके अनुभवाच्या निरनिराळ्या रूपांना आपल्या आयुष्यात आपण दाखल करू शकतो. माझे हे एक्स्पोलरेशन जिथून सुरु झाले तो आरंभबिंदू म्हणजे मेघना यांचा ब्लॉग. आणि आताच त्यांचा खो मिळाला, मला खो वगैरे नवीन आहे पण त्यासंदर्भात थोडेफार माहित आहे. मराठी ब्लॉग विश्व ह्या संकेत स्थळावरचे अनेक ब्लॉग्ज मी पाहत असतांना राज, मेघना यांचे ब्लॉग्ज वाचलेत, मग रेषेवरची अक्षरे ह्या दिवाळी अंकापर्यंत प्रवास केला आणि आज दिलेल्या विषयावर लिहितांना अगदी वेगळे वाटत आहे, नेहमीपेक्षा वेगळं.

दोन-चार वर्षापूर्वी खूप मोठ्या उमेदीने मी पुलंचे ‘एका कोळियाने’ हे पुस्तक लायब्ररीतून शोध-शोधून वाचण्यासाठी आणले. कीर्तीने अतिशय परिपक्व असे ते वाचत असतांना मी बरेच वेगळे अनवट अश्या शब्दांना बघून अडखळायला लागलो, त्यानंतर काही क्षणात शेवटचे चार पाच पाने ठरवून वाचायला लागलो आणि एकदाचे ते वाचून संपवले.

सविस्तर बोलायचे तर, पुलंनी केलेला अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या द ओल्ड मॅन अँड द सी कादंबरीचा मराठी अनुवाद ‘एका कोळियाने’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचा मला आलेला वैयक्तिक अनुभव सांगतोय. मला या पुस्तकाबद्दल काही तक्रार नाही. खो च्यानिमित्ताने माझ्या वाचनात आलेल्या पुस्तकांबद्दल मी आठवू लागलो, तर दोन पुस्तके मला सपशेल निराशा पदरात पाडणारी वाटली, त्यापैकी एक ‘क्रौंचवध’, खांडेकरांचे तर दुसरे ‘एका कोळियाने’ हे. पण प्रसिद्धीचे आणि अपेक्षेचे पारडे जास्त असल्यामुळे ‘एका कोळियाने’ या पुस्तकाची निवड मी इथे केली, आणि माझ्या अनुभावासारखे नेटवर काही संदर्भ लागतात का हे बघत असतांना दस्तुरखुद्द पु. ल. देशपांडे यांनी या पुस्तकाबद्दल दोन शब्द लिहिलेत, ते वाचले. ते अर्थात मी पुस्तक वाचत असतांना वाचले नाहीत, कारण, ते पुस्तक इतके काही मनावर गारुड झाले होते कि मी डायरेक्ट वाचत सुटलो.. आणि अडखळलोही, पण त्यामुळे पुस्तक वाचतानांच्या आठवणी उजळल्यात. आता ह्या पुस्तकाने माझ्या कोणत्या अपेक्षा मोडीत काढल्या, तर एक म्हणजे तो अनुवाद आहे मला शेवटपर्यंत कळत होतं.. दुसरं असं कि, दोनच पात्रात मला स्वत:ला अकोमोडेट करता आलं नाही… हे सर्व माझ्या कमी कुवतीमुळे असेल, किंवा कदाचित माझ्या हे पुस्तक सलग न वाचण्याच्या पद्धतीमुळे; या पुस्तकाच्या अपयशावर इथे पोस्ट लिहिण्याचे कारण जे काही असेल, ते असो. पुस्तक पहिल्यापासून वेगळे आहे असे वाटत राहते.. साधी पण वैश्विक अशी कथा आहे, म्हातारा आणि त्याचे गेलेले अनुभव, एक मुलगा आणि त्याचे येणारे अनुभव… शेवटी शेवटी खरे काही घडणे सुरु झाले, तो म्हातारा कितीएक दिवस त्या अति बलाढ्य माशाशी झुंज देत राहिला, हे मात्र वाचण्यासारखे होते. पण पहिला विनाकारण वाचावा लागणारा भाग सहसा भारतीय, त्यातही मराठी मातीत काही रुजण्यासारखा नव्हता, असे मला तरी वाटते. अ. हेमिंग्वेच्या परिस्थितीनुरूप आणि कालानुरूप आलेले बरेचसे संदर्भ अजिबात समजत नाहीत, तरी तोही त्याकाळचा पुरेपूर मासेमार होता…हे फक्त समजत राहते. ती एक युनिव्हर्सल कालातीत कादंबरी आहे वगैरे, ते त्या मूळ इंग्रजी कादंबरीला लागू असेल पण पुलंना (उगाच लहान तोंडी मोठा घास) ती शर्थ मराठीत सार्थ करता आली नाही…हे माझे वैयक्तिक मत आहे. या कादंबरीचे मी बरोबर दोन भाग करेन, एक कि जो अतिशय रंजक आणि यथार्थ होता, शेवटचा अगदी लहानसा भाग! आणि जो विनाकारण उपस्थित होता, तो सुरवातीचा. याठिकाणी पुलंच्या भाषांतराच्या सामर्थ्यावर मला अनुचित असे काही बोलायचे नाही, ते उत्कृष्ठ भाषांतरण करत. पण या पुस्तकाच्या बाबतीत विशेषत: सुरुवातीच्या, मी तरी समाधानी नाही. मला कधी असे वाटते कि पुस्तकाच्या शीर्षकाचा अनुवादच पुस्तकाच्या अनुवादाला झाकोळून टाकतो आहे.

हे सर्व माझ्या मनीचे..असो. असे वाटते कि हे सर्व निरपेक्षतेखाली तावून सुलाखून निघू शकतील का.. तर कधीही नाही, कारण पुस्तकांना योग्य न्याय देणारे स्वत: लेखकही त्याच जन्मी आणि फिरून जन्माला येऊनही असू शकत नाहीत. कलानिर्मितीचे हे अभिशाप त्या सार्‍या कला-आस्वादकांना भोवतात.. आणि एकदा का कलानिर्मिती झाली कि त्या कलाकारालाही कला-आस्वादकाच्या भूमिकेशिवाय पर्याय नसतो.

मेघनाने तिच्या खो मध्ये आणखी एक खो वाढवून दिला, तो म्हणजे उत्तम पण उपेक्षित पुस्तकं तर या संदर्भात मला इथे जोडायला आवडेल कि, प्रकाश संत यांची उत्तम असलेली उपेक्षित पुस्तके, त्यातल्या त्यात मला वाटलेले उत्तम पण उपेक्षित म्हणजे ‘शारदा संगीत’ हे. लंपनचे तात्त्विक पण प्रवाही असे चित्रण माझ्या मनात भरलंय. लंपनच्या काळातील बड्या शहरात आढळणार्‍या संगीत विद्यालयांचे यथार्थ वर्णन वर त्याच्या भाव-विश्वाचा खुसखुशीत परीघ वाचायला मला खूप आवडलं आणि आवडतेय.

हा खो पुढे नेण्यासाठी मी आणि यांना आवाहन करतो.

Advertisements

12 responses

 1. I am most likely reading this blog first time/blame it on time, will and so many other factors. I guess one reason, likely one is the whole set up of old man, the backdrop is unknown to us

  जून 25, 2012 येथे 9:58 pm

 2. लग्गेच खो घेतल्याबद्दल आभार. 🙂
  मला ‘एका कोळियाने’ आवडल्याचं आठवतं. त्यातल्या म्हातार्‍याची ती जिद्द, मिश्किली आणि शत्रूशीही(माशाशी)नातं जोडणारी दिलदारी मला खूप आवडली होती. पण नंतर विलास सारंगांनी अनुवादाबद्दल लिहिताना या अनुवादाची केलेली चीरफाड वाचली, तेव्हा भाषा शब्दांखेरीज किती वेगवेगळ्या माध्यमांतून (विरामचिन्हं, वाक्यांची लांबी नि पोत, इत्यादी) आशय प्रकट करत असते, नि भाषांतर करणार्‍यानं किती जागतेपणी काम करायला हवं त्याचा साक्षात्कार झाला. मग ते पुस्तक तरीही आवडलंच, पण तो चांगला अनुवाद नाही, अशी खूणगाठ बांधली गेली.
  चालायचंच!
  बाकी संतांचा लंपन आहे भारीच. पण तो काही उपेक्षित म्हणता यायचा नाही. उलट बराच लोकप्रिय आहे सध्या. तुम्हांला असं नाही का वाटत?

  जून 26, 2012 येथे 10:10 सकाळी

 3. .

  Samved धन्यवाद, असू शकेल..
  @मेघना, लंपन याला प्रसिद्धीचे वलय मिळालेय.. पण त्यातल्या शारदा संगीत ला कमी गुण मिळालेत असे मला तरी वाटते, वनवास, पंखा यापेक्षा थोडे वेगळे असेल म्हणून कदाचित.. आभार प्रतिक्रियेबद्दल..आणि जाता जाता, माझा विचारांचा ठाव कमी असल्यामुळे या पोस्टमध्ये चुका झाल्या असतील, तर लहान समजून माफ करावे.

  जून 26, 2012 येथे 12:00 pm

  • विचारांचा ठाव, लहान समजून माफ ….. देवा, चिल माडी! सगळे लिहिण्याची खाज भागवणारे लोक आहेत इथे. कुणी लहान-मोठं नाही… 🙂

   जून 26, 2012 येथे 9:26 pm

   • .

    अरे, याविषयीच मी एक पोस्ट लिहितो आता..!

    जून 27, 2012 येथे 10:42 सकाळी

 4. छान लेख. मी ‘ओल्ड मॅन ऍंद द सी’ इंग्रजीत वाचले आहे. अफलातून कथा आहे. इंग्रजीतल्या कथा सहसाअनुवादित वाचायला आवडत नाहीत – अपवाद पॅपिलॉन किंवा पाडससारख्या कथांचा. कोळियानेबद्दल दोन्ही प्रकारची मते ऐकली आहेत.

  जून 26, 2012 येथे 10:58 pm

 5. .

  राज, आभार लेख वाचल्याबद्दल.. मूळ हेमिंग्वे भारी आहे, असं कोळियाने वाचूनही कळते.

  जून 27, 2012 येथे 10:41 सकाळी

 6. Samved

  Push your kho pl…

  जून 30, 2012 येथे 5:01 pm

 7. Samved

  Thanks for pushing it!

  जुलै 16, 2012 येथे 9:24 pm

 8. .

  @ Neeraja, thanks for taking it up!! Hope to see your stuff soon..

  जुलै 21, 2012 येथे 12:40 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s