वैयर्थ जेथे उमगे सदा…

चानी

पूर्वापार पासून असलेले, आताही तितक्याच आत्मीयतेने लिहणारे आणि मीही अगदी ढवळून निघालोय त्या लिखाणाच्या परसेप्शनने, असे काही ब्लॉग्ज, ब्लॉगर्स मी काही दिवसापासून वाचतोय, त्यापेक्षा ग्रहण करतोय. १-२ आठवड्याचे उरलेले दिवस मी फक्त तेच करतोय. संवेद ट्युलिप गौरी मेघना राज केतन आणि कितीतरी बरीचशी मंडळी यांनी माझ्या मनाचा ठाव विस्कळीत केलाय, काही दिवसांपासून. मेघनाने मागच्या पोस्टवर म्हटल्याप्रमाणे लिहिण्यासाठी जमलेली सारी. खरेच तसे कोणाला वाटू नये म्हणून, दुसरे काही कामे करणारी ही मंडळी. मी असा नुकता सीएच्या जंजाळातून निसटू लागतोय, (निघालो नाहीय) आणि गेल्या तीन-साडेतीन वर्षांत मी जणू अज्ञातवासात होतो… केवळ ब्लॉग्ज बघायचो, लिहिण्यातली मजा घ्यायचीय असं नुसतं वाटायचं. मेघनाने माझ्या लहान समजण्याच्या बुडबुड्याला छानसं मारल्यावर मला भरभरून आलं. त्यांचे ब्लॉग्ज वाचून मी एखाद्या अरण्यातील (सीएच्या) ऋषींच्या (सन्मान्य ब्लॉगर्स) आश्रमातील लहानसा नुकताच उपनयन झालेला बटू झालो आहे, असे वाटत राहायचे. असे हे सारे माझ्या मनात केव्हाचे हिंदकाळत होते.. असो. इथे आणखी एक सांगायचे आहे, राज च्या ब्लॉगवर निनावी कमेंट आली आहे, खो संदर्भात.. मला त्या व्यक्तीला एवढंच म्हणायचं आहे कि संवेदचा ब्लॉग (जिथून खो सुरु झालाय) खो संदर्भी काय विचार मांडतो आहे, ते बघा. संकुचित असा शब्द या व्यक्तीने (सन्माननीय, हीसुद्धा) खो बाबतीत संबोधला आहे, त्याने खरंच त्या गोष्टी काही संकुचित होत नाहीत, फक्त त्या गोष्टींना संकुचितपणाचाही एक आयाम मिळतो, आणि त्या गोष्टी खरोखर व्यापक बनायला लागतात. चित्र्यंच्या चानीची मला आठवण झाली इथे, कोकणातला निसर्ग जसा तिला काठोकाठ लाभला होता आणि तिचे नशिबही त्याच कोकणातल्या मातीसारखेच. हे ब्लॉगर्स ही कोकणच्या रानमेव्याइतके रसरशीत आहेत, त्यांना विशेषणं किती लावणार.. नशिबही तसेच घेऊन आलेत असे म्हणायचे तर हे म्हणणे आता तुम्हां-आम्हांच्या हाती आहे.

 

Advertisements

2 responses

 1. चित्र्यांच्या चानी ची आठवण झाली ते बरेच झाले,त्यामुळे तरी ते पुन्हा वाचण्यात आले.खरोखर आपले म्हणणे सार्थ आहे .अप्रतिम वर्णन आहे कोकणातले आणि त्यात असलेल्या प्रत्येकाच्या भावभावानांचे . धन्यवाद दुरित

  सप्टेंबर 1, 2012 येथे 8:04 pm

  • .

   धन्यवादवर धन्यवाद बोलायला मी लाजतो….

   सप्टेंबर 6, 2012 येथे 6:15 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s