वैयर्थ जेथे उमगे सदा…

फाटका पाय

माझ्या मनात सारे जमलेले पाचोळे..कधीचे; काही जाळण्याकरता आणतो.., इथे

नावाच्याऐवजी एखादी वेगळी वसाहत करून काय मिळणार, तरी नामाहून निराळे असे काही आहे असे मला सारखे भासत असते.. म्हणून काय इथे मी लिहिण्याचा उगीच आटापिटा करायचा. या जगाच्या एखाद्या कोपर्‍यात राहणार्‍या एखाद्या जीवाच्या मनातल्या या घडामोडींना जगात काय स्थान द्यावे, मनात येते…

मनगटात सारखे दुखतेय..

भ्रष्ट असलेले आम्ही लोक आहोत, आणि आमच्या प्रत्येक आचारामागे भ्रष्ट हेतू आहेत. डोक्यात नाही तर गुडघ्याभर आमच्या नस्ते नस्ते सारखे विचार घुमत असतात…. अश्या टाईपची प्रतिज्ञा म्हटली की मन कसं शांत होतं…. निष्कारण चांगलं बनण्याची तगमग कोण करतंय आजकल, उगाच धोंडा पायावर पडल्यासारखं होतं.

आजही पाऊस कसा मनसोक्त पडतोय, ना त्याला उन्हाच्या काहिलीने बेजार झालेल्या सृष्टीची पर्वा, जरा ना सावकाशीने हाताळण्याचा सोश; वर धडा धड पडून कुजक्या वासाची लाखोली वाहून सोडतोय.. कसा चांगला वागून पडणारा पाऊस तो मुळीच नाही.

महिन्याला पाच रविवार आलेत, याने मनाला किती दिलासा मिळतोय.

माणसा-माणसांत तहाची कमतरता आणि माणसावेगळ्या दुनियेत बुद्धीची वानवा.. अरे, हे काय भलते सलते होऊन जाते…कसे कोणाच्या हातात काही नाही; गुरकावण्याच्या शर्यतीत सर्वच पहिले.. मागमूस शोधत राहायचा तरी, कधी मनात..कधी बाहेर!

वेगाने धावत जातोय आणि त्या जळलेल्या पोळ्यातून ठिबकत चाललेला माझ्यासाठीच्या मधाचा थेंब झेलून पाहतोय पण;.. कुठलातरी हा पण मध्ये येतोय सारखा कधीचा मनात..,

मनात कोंडलेला श्वास बाहेर टाकून देतांना येणारी विचित्र भावना..मनातूनच आलेली काय? काय खटकतंय कधीचं..

हो हो… नक्कीच माझ्या निकालाची तारीख जवळ आलीय.. तोच पसार्‍यात पाय फाटका.. निवेल ना इथे लिहून?

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s