वैयर्थ जेथे उमगे सदा…

सत्याहुनी स्पष्ट

आषाढातील, गुरूंसाठी राखीव पौर्णिमा आज आहे. माझ्या लहानपणापासून आतापर्यंत शिक्षकांशिवाय माझे पान (वही-पुस्तकांचे) हलले नाही. सरळ गुरु आहेत ते शिक्षक, असं म्हणणार नाही. गुरु अर्थात शिक्षकच हा थोर गैरसमज भारतात मकॉलेने शिक्षणात केलेल्या घोळानंतर झाला असावा. आजच्या दिवसाला गुरु-शिष्यांच्या लाखो चर्चा घडतील. विचारांना गुरूंचे दालन मिळेल, इतक्यातल्या निरनिराळ्या डेजसारखी गुरुपौर्णिमा साजरी केली जाईल.

बालवाडीतल्या एकुलत्या एक शिक्षिकेला माझ्या डोक्यावर तर्जनीला दुमडून टकटक करायची सवय होती, अशीच सर्वांना त्या बोटाने टपली मारून शिक्षा करत. पहिली-दुसरीत काही आठवत नाही, कारण मार बसलेल्यानेच त्या शिक्षकांची आठवण राहत असे. तिसरीत आपले प्रस्थान वेगळ्या शाळेत हलल्याने काहीसे निरोप घेतांनाचे त्या प आद्याक्षरी आडनाव असलेल्या सरांचे डोळे आठवतात. त्यानंतर माध्यमिक शिक्षणाचे वारे आले तसे गेलेत. दहावीचे सो कॉल्ड गुरु लाभले नाही, हे एकापरीने चांगलेच झाले. आता हा शिक्षणाचा टेंभा मी गुरुपौर्णिमेला मिरवतोय का?,.. तर मी अजूनही सापडत राहतोय या शिक्षकांमधल्या गुरुरूपाला, आणि त्याला साक्ष देत इथे लिहिण्याचा प्रयत्न करतोय… 

माघातला का असाच कोणत्यातरी महिन्यातला कोरडा दिवस मी, खाटखुट करत घालवत.. सीएजन्य घेरावात कसातरी झालेलो, मग बरे काही वाटले ते एखाद्या गुरूंच्या नाही पण काही अंशाने गुरुरूप डोळ्यांच्या, कानाच्या, मनाच्या ज्या काही सेन्सरी बिंदुंतून आरपार मेंदूत गेल्याने..  त्या प्रसंगाचे  बारकावे तर कालौघाने खाल्ले.. पण मनावर त्याच्या चिरा पडलेल्यात अजून.. किती शांत आणि निर् ने सुरु होणारी सर्व परिमाणं मला तेव्हा भंजाळून निघायला लागलीत. तेही एक विद्यार्थीभोवती फिरणारे वलय होते., आणि सीएच्या परिश्रमातून एक श्रमपरिहार नाही रे किती जड शब्द हा, उसंत घेऊ देणारे होते.. होते म्हणजे आहेत. मीही इथपर्यंत आहे ते विल पॉवर- डेव्हलप या शब्दांनी; विल पॉवर- डेव्हलप, असं साधं म्हणत विल नक्कीच उंचावणारे ते विद्याश्रमी आहेत, शिक्षक नाहीत.

Advertisements

One response

  1. पिंगबॅक दुरितांचे तिमिर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s