वैयर्थ जेथे उमगे सदा…

सदा विवेकानंदमयं

कालच भावासोबत त्याचे सूत्रसंचालनाचे काम घरच्यांच्या वतीने प्रेक्षक यानात्याने, बघण्यासाठी मला एका कार्यक्रमात जावे लागणार होते. कार्यक्रम व्याख्यानाचा होता. ‘राष्ट्रभक्त विवेकानंद’ यांवर व्याख्यान, सुनील चिंचोळकर यांच्याकडून. इति, व्याख्याते समर्थ अभ्यासक आहेत, असे त्यांच्या आभार प्रदर्शनार्थ भाषणात कळले. १२ वर्षे सज्जनगड स्थानी त्यांनी समर्थांवर अभ्यास केला आहे. अनायासे काही ब्लॉग्ज बघत असता सुनील चिंचोळकर यांचे समर्थांच्या अकरा स्तोत्रांवर वाचले. असो. तर, शीर्षक जे मी निवडले आहे, ते आहे त्या कार्यक्रमातील वैयक्तिक गान सादर केले, त्याच्या प्रत्येक ओंळीनंतर येणारे शब्द… हे गीत संस्कृतमध्ये आहे, अतिशय सुंदर.. साहजिकच विवेकानंदांवर आहे. प्रस्तुत व्याख्यान हे स्वामी विवेकानंद सार्ध (स-अर्ध) शतक जयंतीच्या वर्ष-समारंभानिमित्त आयोजित केले होते, १८६३ ते २०१३ असे स्वामीजींचे १५० वर्षांचे क्रमण. अगदी राष्ट्रीय, आणि जागतिक स्तरावर ह्या १५० व्या स्वामी विवेकानंद जयंतीचे १२ जानेवारी २०१३ ला भव्यदिव्य स्वरुपात समारोपाचे कार्यक्रम होतील…त्यासाठीच हे सर्व व्याख्यान आणि इतर कार्यक्रम म्हणजे, पूर्वपीठीका.

From Wikipedia

On the left Vivekananda wrote in his own handwriting: “one infinite pure and holy – beyond thought beyond qualities I bow down to thee”.

स्वामी विवेकानंदांबद्दल बरेच काही माहित आहे, सर्वांना. मला माझ्या मनात उमटलेले काही मुद्दे इथे लिहायचे आहे, ते असे कि, ११ सप्टेंबरलाच स्वामी विवेकानंद यांनी विश्व विख्यात व्याख्यान सर्व धर्म परिषदेसमोर केले, आणि त्याच तारखेला २००१ वर्षी वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवले गेले. दुसरे असे कि, अजूनही अशी सर्व धर्म परिषद भरते का, आणि तसे आयोजन होत असेल तर त्या परिषदेस तितकेच महत्त्व आहे का, जितके स्वामीजींच्या काळात होते. स्वामीजी निर्विवाद असे जीवन जगले, आणि वादांचा भोवरा कधी अश्या व्यक्तित्वाला न लागो, हीच परमेश्वराला प्रार्थना. स्वामीजींना स्वप्नात येशू ख्रिस्तासम कुणी व्यक्ती काही सांगत असे, काय ते त्यांना कधी समजले नाही.. जर ते काही समोर आले असते, तर आपण  आपल्या एकूण एक धर्म कल्पना-सत्य यांना आता कसे हाताळत असतो..निश्चितच, आतापेक्षा काही निराळे, स्वामीजींच्या  मातृभूमीवर असलेल्या निस्सीम प्रेमासारखे! तसेच त्यांच्या वेदांतातील गूढ-अतिगूढ संकल्पनांना सोप्यातल्या सोप्यात करून दाखवण्याच्या गुणामुळे; आपण निश्चितच आपले वेगळेपण आता जपतो आहोत. या काळात, स्वामी विवेकानंद असते तर,… अगदी कोणताही काळ त्यांच्यासाठी सुयोग्य असाच असेन, कारण ते कालदर्शी होते.. सर्वव्यापकत्व केवळ त्यांच्या मर्त्य शरीरामुळे त्यांना कधी शक्य झाले नाही. मध्यंतरी, त्यांच्या आवाजात असलेली सर्व धर्म परिषदेत त्यांच्या झालेल्या व्याख्यानाची  (१८९३ यावर्षी) ध्वनिफीत इंटरनेट फिरत होती,.. हे कधी शक्य आहे का? सवंगतेचा काय तो कळस गाठला गेला, याने. किती आपण झापड लावल्यासारखे वागतो, विचार करतो, निर्णय घेतो, जीवनही तसेच व्यतीत करतो. स्वामीजी प्रखरपणे म्हणतात, फेका, दूर सारा तो अज्ञानाचा चिखल तुमच्या जीवनातून.. उठा, जागृत व्हा, निर्भय बना.. सश्रद्ध बना.. अमृताचे पुत्र असताना भेकडासारखे जीवन घालवता, अभ्यास करा, संशोधन करा, विचारशील बना, पावित्र्य जपा, मातृभूमीचे रक्षण करा..जीवन झोकून द्या आपल्या उद्दिष्ठासाठी.. खरे जीवन जगा, भ्रमपाश तोडा. अंधश्रद्धा अशी जगात वस्तूच नाही.. एक तर ज्ञान असेल, किंवा श्रद्धा तरी. श्रद्धा ही पूर्णपणे श्रद्धाच असते, त्यात ज्ञानाचा काहीएक अंश नसतो..केवळ आंधळेपणाने झोकून देणे असते..मुळातच जी आंधळी आहे, तिला अजून अंधश्रद्धा म्हणूनतरी काय उपयोग? असे तत्त्वविचार आहेत, स्वामीजींचे गुरु, रामकृष्ण परमहंस यांचे.

माझ्या जीवनातील मळभ स्वामी विवेकानंद यांचे विचार वाचल्याने दूर सरतात. खरेच, सुर्याहून तेजस्वी अनुभूती आपण प्राप्त करतो. आपल्या सर्वांत स्वामी विवेकानंद आहेत, आपल्याला ते प्रगटीकरण करायचे आहे.. नरेंद्रनाथांनी ते केले, आपणही करूत, आपल्यात आहे तो फक्त फरक, नरेंद्रनाथ ते स्वामी विवेकानंदापर्यंतचा…तो आपण गाठायचा.,(देव कणाच्या अस्तित्व-निरीक्षणाला सार्थ कृतिशीलतेत रुपांतर करूयात.) आपण आपले सभोवार तरी तेजोमय करू.. काही अंशाने तरी आपण स्मृती-भृती यांपासून पलीकडे जात, जीवन उन्नयन करू. आणि, हेच आपले स्वामीजींच्या १५० व्या जन्मदिनासाठी वैयक्तिक पुष्प-समर्पण.

Image Source – Wikipedia

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s