वैयर्थ जेथे उमगे सदा…

पार्टिकल.

ऑलिम्पिकची पूर्वसंध्या जाणवू लागलीय. बीजिंगला काही प्रमाणात क्लोज्ड वातावरण होते. आणि, त्याउलट आता अतिशय ऑफीशिअल प्रमाणात लंडन ते घेऊन येणार…(म्हणजे??)

मला इथे बसून काय ते कितीही तारे तोडता येतात (चर्चा करता येते), पण खरेच काही घडामोडी चालू आहेत कि, नुसती हवा आहे हे कळायला मार्ग नाही. अर्थात, भारतीय बैठकीला ऑलिम्पिकचे तोरण लागो, न लागो आपले भारतीयत्व आपण कधी सोडणार नाही.. इथून (भारत) जी चर्चा सुरु होते, ती काही काळ रंजन करतेच पण, बाहेरची चर्चा इथे आली कि, सर्वांना उधाण येते, भारतात न कोणी असा कि त्याला चर्चा करायला आवडत नाही…मग पेव ते फुटत राहतेच, त्यात इथलं काय नि बाहेरचं काय. भारंभार बाष्कळ म्हणजेच चर्चा, मग ती आलिशान महालातली (राजस्थानच्या) असो, कि दूरदूर पसरलेल्या जंगलातली (क्रांतीसैनिकांच्या). मी आर्टिकलशिपला तरी काय करायचो, मी माझ्या घरातली चर्चा माझ्या कलीग्जना सांगायचो, नाहीतर, घरातली चर्चा डोक्यात बंद करून, ऑफिसमध्ये चालत असलेल्या चर्चेत उडी घ्यायचो. परत, घरी आल्यावर ऑफिसची चर्चा बंद करून, तीच घरातली चर्चा ऑन..चर्चा-चर्चाच करत राहायचो, बाकी काय तेव्हा मला उद्योग नव्हता. अरे, थोडं तरी शांत…विचारांना सार्थ बनवून काही करायचं आहे (होतं)..आताही वाटतंय. मग, मी फेकून देतो, ऑलिम्पिक-चर्चा वगैरे, आणि…. पण परत मी जे इथे लिहणार ते चर्चेचाच भाग (मनातल्या/डोक्यातल्या) असणार, तर करू काय मी? असेल.. माणसाच्या विचारांच्या काहुराला चर्चाच काय तो स्वल्पविराम.. मला माझ्या मनात विचारांनी काहूर दाटून आले कि, कुण्या जिवलग्याला पकडून चर्चा करावी लागते. आयुष्यभर जगात सारेजण हेच करतात. मी मनातल्या मनात मुंगीला विचारतो, तुमच्यातही असते का अशी चर्चा? मुंगी मला तिच्या मनातल्या मनातून माझ्या मनातल्या मनात उत्तर देते, हे बघ मी धावते अशी….. बस्स मला अजून काही माहिती नाही, मी मग मनातल्या मनात यावरच चर्चा सुरु करतो…आणि तत्क्षणी जाणवू लागते, मानव अजून अपरिपूर्ण आहे, संशोधनाच्या जगात आहे.. चर्चा घडवतो आहे, त्याला त्याचा ‘शोध’च अजून गवसला नाही आहे.. काय करावे ते कळत नाही, एवढे मोठे जीवन कसे व्यतीत करावे ते कळत नाही. आणि उलट, मानव सोडून सर्वच्या सर्व जण आणि ही सृष्टी या संशोधनाच्या पलीकडे केव्हाच निघून गेली आहे, त्यांना त्यांचे शोध कधीच गवसले आहेत.. ‘झेन’चे आप-आपल्या कामात गर्क राहून अर्थबोधता निर्माण करणे हे प्रमुख सूत्र त्यांच्याच जीवनाने प्रेरित झाले असावे. धडपडणे, चर्चेत गुंग राहणे, व्यर्थता वाहणे (वैयर्थ जेथे उमगे सदा…) ही क्रियापदेही त्यांच्या शब्दकोशात नाहीत. त्यांचे देवाचे कोडे कधीच उलगडले असावे. आणि केवळ, ह्या मानवाचाच पाय त्यासाठी कुठे अडकलाय, ते कळत नाही. उद्वेगाने मग बुद्धजीवी म्हणवून खरेच, किती क्षुल्लक आहोत आपण, याचे भान मला त्यावेळी येते…आणि ते सदैव राहते.

Advertisements

One response

  1. Amit

    One of the best

    फेब्रुवारी 15, 2013 येथे 6:38 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s