वैयर्थ जेथे उमगे सदा…

मराठीतलं इंटरअ‍ॅक्टिव्हत्त्वं

इंटरअ‍ॅक्टिव्ह असणं…परस्पर संवाद असणं हे मराठीत इतके दुर्मिळ आहे कि, ते कुठे जरासे दिसले तरी वरदान लाभल्यासारखे वाटते. इंटरअ‍ॅक्टिव्हिटी कधी आणि कशी मोजली जाते, हे म्हणणे राहू द्या बाजूला; त्याहून ती कशाशी खातात, आणि वापरतात असे वगैरे म्हणलं कि मराठीजनांना गहन प्रश्न पडतो. खेद इतकाच कि, मराठी मनास मराठी मन उमगत नाही. फारकती घेऊन, तटस्थ राहून बेटं तयार होत असतील बहुतेक मराठी मातीतल्या एकेकांची, कुबेरांची मोठ-मोठाली; त्यावर आपलं बेटाधिकारी बनणं कसं ऐटीचं, हे दाखवण्यात सारा वेळ दवडायला मराठी लोकचं कशी देवाला सापडलीत. मी बोललो, तू बोलला.. याहून अधिक संवाद म्हणावा तर, नाहीच कुठे. व्यवस्थित मार्गदर्शन, यथासांग तत्त्व चिकित्सा, स्वानुभवाचे अवलोकन असे सारे मांडे मराठीने जगाला दिले असावे, इतपत आपली पावले त्या मुळाशी जाऊन ठसली आहेत. दि. बा. मोकाशी एकमेव असे कि, संवादावर संवाद रचित कथा आणून पारडे हलके करण्यासाठी झटले, त्यांचे परिच्छेदाचे रकाने जेव्हा कथेत येत, तेव्हा वाचकांना गोष्टी काहीच कळत नसे..आणि केवळ संवादावर वाचकांना त्या कथेत काय चालू आहे त्याचा अंदाज येत असे. संवादाचे किती रे महत्त्व हे सांगणे म्हणजे सूर्याचे वर्णन काजव्याने करणे होय. मला झोंबलेल्या मराठी-ब्लॉग-इंटरअ‍ॅक्टिव्हिटीचे उखळ मी पांढरे करीत नाही, एकंदरीत मराठी समाजमनाचा जो सूर आहे त्यावर इंटरअ‍ॅक्टिव्हिटी करणेच योग्य म्हणून मी इथे पाहत आहे. मराठी संस्कृती प्राचीन, सर्वांगीण आहे..इथे मागितले कि तिथे सूप वाजते इतकी निखळ आहे. इतर संस्कृतीचा चांगला बदल मराठीत घडतो, हे काय कमी आहे. पण आत्मकेंद्री आनंद मानाने मिरवावा, तो मराठी लोकांनीच. आपल्याच विजयाचे पोवाडे आपल्याच अंगणात गायले जातील, ह्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिले जाईल, ते मराठीतच. ज्ञानवान खुशहाल मराठीत आहेत, पण ते पुरातन लेण्यातल्या शिल्पांमध्ये कोंदण डकवण्यासारखं, अशी अमाप कोंदणं आहेत, पण जशी पुलंना भारतीयांची लेणे निर्माण्यातली कलाकुसर कधी आवडली नाही, तशी हीसुद्धा कोंदणं संवादाशिवाय कलाकुसर-व्यतिरिक्त काही नाहीत.

असो. नकारात्मक मराठी शिंतोडे मला इथे उठवायचे नाहीत. मी अनुभवलेलं इतर संस्कृतींतलं खुलवणारं इंटरअ‍ॅक्टिव्हत्त्वं इथे मांडतो.

१. मारवाडी लोक जसे संघटन प्रिय..(पर्यायाने त्यांना त्यांच्यात बोलण्यात कुणी हुशार असो, वा नसो काही फरक पडत नाही, आपली अस्मिता जपण्यात ते निश्चिंत असतात.)

२. गुजराथी लोक जसे संभाषण चतुर..

३. इंदुरी (ज्यात मराठी टक्का खूप जास्त) लोक जसे बोलण्यात चोखंदळ..

४. बंगाली जन जसे संवादात सर्वाहून सर्वात व्यापक..(हुशारही म्हणावे लागेल.)

५. पंजाबी लोकांचे जसे बोलण्यात मनापासून सर्वस्व देणं, संवादातून श्रीमंती हाताळणं-जपणं.

६. कर्नाटक, केरळचे लोक जसे मितभाषी..कमीच शब्दात जास्तच मर्म बोलणं.

७. ईशान्य भारतीयांचे नम्रातीत होऊन बोलणं.

८. मला वाटते, काश्मिरी आणि आपण मराठी लोक एकच आहोत, इंटरअ‍ॅक्टिव्हिटीबाबतीत…

माझे हे बरळणे म्हणजे माशीला हुसकावून लावण्याइतके निरर्थक आहे. काय?

Advertisements

2 responses

  1. Samved

    I guess we (Marathi people) are becoming more and more frustated and indifferent to our identity (and I am writing this too in English…some issues with my Marathi editor). It’s not a business language for a service community like ours (unlike Marwaris, Punjabis, Sindhis or Gujjus), nor we have got a uniform cultural composition (like Keralites, Telagus, Kannada etc). There is a pecular habit we have got; we very easily forget our heros, our goodness and you may count culture too.

    जुलै 16, 2012 येथे 9:30 pm

  2. .

    नक्कीच, व्यावसायिकी आणि एकसूत्रीय नसल्याने संवादात तोटे वाढलेच, त्याचबरोबर आपल्या गुणांचे संवर्धनही करायला आपण धजत नाही. विस्मरणाचं पात्रं सर्वदिशा वाहतं खरं. पण मला वाटतं नाही, आपण विसरतो इतक्यातल्या इतक्यात.. आपल्यातल्या आपल्यातच संकुचितपणा वाढत असेल, तर त्याला काय करणार? अजून एक, मराठी नाटकांत असणारे संवाद तरी अश्या प्रवृत्तीला बिमोड करण्यास पाठबळ करतील तर, तिथे सादरीकरण सारेच आत्मप्रवाही (प्रतिसादात्मक नसणारे) बनलेले, संवादही..

    जुलै 16, 2012 येथे 10:53 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s