टेन्टेटिव्ह!

रिझल्टची बोंबाबोंब करायला सीए इंस्टीट्युटला एका शब्दाची नितांत गरज असते, टेन्टेटिव्ह! पण, यावेळेस निदान फायनलसाठी हा शब्द न वापरता आपली न डगमगणारी परंपरा सांभाळत रिझल्ट देण्यासाठी, वांदे ते केलेच. १४ ला निकाल प्रदर्शनचे नोटीफिकेशन आल्यावर, त्यात नमूद केलेल्या शब्दांना छाटत १७ लाच भलती (रिवाईज़्द, त्यांच्या भाषेत) नोटीफिकेशन आली. त्यानुसार आता उद्या १९ ला लेटेस्ट बाय संध्याकाळी ‘ती’ बोंब येणार. खरं सांगायचं तर, मी सीएच्या निकालादरम्यानच टेन्टेटिव्ह या शब्दाची गाठभेट घेतली आणि मग ते उच्चारात कसं मांडावं, हे न कळण्याइतकी हलाखीची स्थिती झाली होती. आता, तात्पुरतीकरण चांगलंच रुळायला लागलं आहे, टेन्टेटिव्हचं!!

संवेद च्या खो-खो ला हुरूप येत असेल, तर त्या अनुरूप मी रूप धारण करावे.. माझ्या निकालात निघण्याच्या वातावरणात, असे काहीसे मनात दाटून राहतंय. पार्टिकल या पोस्टमध्ये वर्णीत चर्चारुपाला काहीश्या विसंगतीला जागा याआधीच्या पोस्टला लोकांकडून (हे वाचणारेच, हमखास) दिली जात असेल तर आणि, गल्लती करण्यास त्यांना खूप काळ-वेळ-सवड मिळाला तर, म्हणून मी खुलासाटाइप इथे लिहणार आहे. चर्चेत एखादा विषय असणे, आणि तो नसला तर संवाद, परस्पर देवाण-घेवाणात सांधले जाणारे हितगुज गायब होणे, हे मराठीत सर्रास दिसून येते. आताच, राज यांच्या ब्लॉगवर ‘हिग्ज बोझॉन’ ची चर्चा घडली..विज्ञानसंबंधित चर्चज्ञ तिथे लगेच सरसावलेत. विषय मांडण्याचा भरभक्कम वरदहस्त राज कडे आहे, म्हणून मग प्रतिसादकांनी आपल्या जीवनाच्या घडामोडींना शब्दांत न उतरवता, राज च्या पुढील विषयाला हात लावण्याची वाट बघायची. मिसळपाव, मनोगत, मायबोली, ऐसी अक्षरे अश्या कित्ती अजून माहितही नसलेल्या विस्तृत साईट्स आहेत. एकप्रकारे चर्चास्थळेच आहेत, तरीही तेथील अगणित चर्चांचा रोख डळमळीत होण्यातच जमा असतो. मग तिथले; जेन्यूईन चर्चा सामील असणे, त्यात संवाद मार्गस्थ राहत असणे, वाढता वाढता वाढे शेअरिंग जपले जाणे इत्यादी परीस स्पर्श चर्चांच्या डळमळीत होण्याच्या सवयींमुळे झाकोळून जातात. ज्यांचा केवळ ब्लॉगिंगच्या ट्रेंडचे मजेंडे करण्याचा इरादा असतो, त्यांचा तिथे सुकाळ असतो. असो, पोस्टमॉर्टम नको करायला इथे; असे सारखे वाटते, एवढं तर नक्की दिसलं आहे, कि मराठीत सख्य निर्माण होत नाही, टिकून राहत नाही, आणि ते फलद्रूप होत नाही.
ते गाणं आहे नं, दिए जलते है, फुल खिलते है बड़ी मुश्किल से मगर, दुनिया में दोस्त मिलते है
माझा बडबडण्या मागे एकूण एक उद्देश हाच कि, जीवन जगा, तेच आपल्या अभिव्यक्तीत मांडा, कोण काय बोलेल या व्यर्थ गोंधळात पडून आपल्याच मराठी जीवन-भाषा-संस्कृती-उद्यम इत्यादीच अवमान करू नका. मराठी भाषा लाभणे, त्यावर गौरवपर गीत गाणे, इतक्याच भानापलीकडे सळसळीत जीवनाचा झरा शोधा.

उद्याची संध्याकाळ निर्णायक ठरणार नि:संशय…परत एक ते गाणं आहे नं,
वो शाम कुछ अजीब थी, ए शाम भी अजीब है ….अजीब तर आजची संध्याकाळ आहे, जवळ-जवळची.   
वो कल भी पास पास थी, वो आज भी करीब है …..आता बघू ती करीब राहते, कि करीबहूनच जाते.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s