वैयर्थ जेथे उमगे सदा…

निकालाचे वजनपत्र[?]

नाटकाचा भरगच्च नसलेला कार्यक्रम पाहतांना अगदी अनपेक्षित वेळांत सायलेन्टली मेसेजेस टाइप होतात…….

तो: क्या हुआ तेरा

मी: रिझल्ट लगा क्या

तो: हा

मी: क्या है तेरा रिझल्ट, अभी में बाहर हुं, कॅन यु चेक माय नं. ^^^^^^

(आर्टिकलशिपवाल्या सीएच्या ऑफिस वरून कॉल, उचलता येत नाही.)

तो: यु पास्ड बोथ

दरम्यान हळू आवाजात मी माझ्या शेजारी बसलेल्या भावाला म्हणतो, निकाल लागला..निकाल लागला..तरी त्याला काहीच कळत नाही.

(ऑफिस वरून परत कॉल, म्हणून मी तिथून उठतो आणि लू च्या दिशेने निघतो, आता तो एक्स-कलीग्जचा असतो, त्याला म्हणतो, अमर्यादित बोलण्याच्या ऑफिसच्या नं. वरून कर, तेवढ्यात अजून एका मित्राचा कॉल वेटिंग येतो.)

मी: wht!

तो: हा यार, मेरा सेकंड नही हुआ

खरंतर माझ्या मावसभावाचे संगीत दिग्दर्शन त्या एकांकिकेला होते, ती एकांकिका स्पर्धा होती, अर्ध्यावरही पाहिली असेल नसेल तर हे व्यत्यय..सुखावणारं, आणि काहीसं संभ्रमित!

मग त्या कॉल वेटिंगवाल्या मित्राशी बोलतो, त्याच्याकडूनही माझा रोल नं.चेक करतो, पुन्हा ऑफिसच्या अमर्यादित बोलण्याच्या नं. वर कॉल करवून एकदा आणखी खात्री करून घेतो. आभासी का होईना माझा निकाल माझ्या हाती लागतो.

एखाद दुसरी, बातमी अशी मिळणे म्हणजे काय हे ज्यांनी अनुभवले असेल, त्यांना नक्कीच माहित.
चार तोंडं बोललीत, तर ती गोष्ट खरी व्हायला लागते, निदान तसे भासते तरी…

त्यानंतर माझी मोबाइल फोनवर अखंड बडबड चालू झाली होती. सर्व माझ्याचकडे पाहत आहेत, असे भासही होत होते. आणि मला इतकी उत्कंठा दाटून येते, कि मी जवळच असलेल्या माझ्या आर्टिकलशिपवाल्या ऑफिसमध्ये धडकतो. आता, खरी गम्मत माझ्या डोळ्यासमोर सुरु होते, मग यथोचित माझ्या निकालाचे दर्शन केल्यावर तिथेच तथाकथित सीएकडून लेक्चरबाजी होते, माझे बुद्धी-ग्रहण-भ्रमण सारे काही होते. दोनच दिवसापूर्वी अ ज ओक (सी ए) यांच्या ब्लॉगवर मार्क्सची पोस्ट आली, त्यावर काहीशी नकारात्मक माझी कमेंट होती, त्यावर रिप्लाय त्यांनी केला तसा, आता मला माझे सी. ए. इंस्टीट्युटवरचे मत रिझर्व्ह करावे लागतील…! 

Advertisements

7 responses

 1. Samved

  Congrats

  जुलै 21, 2012 येथे 1:48 pm

  • .

   मनापासून धन्यवाद..

   जुलै 21, 2012 येथे 4:15 pm

 2. आल्हाद alias Alhad

  चला पास तर झालास ना… बाकी बुद्धी-ग्रहण-भ्रमण छोड देने का.

  जुलै 27, 2012 येथे 11:20 सकाळी

  • .

   धन्यवाद.. अगदी योग्य बोललात, तरी तगमग राहतेच कुठेशी..

   जुलै 27, 2012 येथे 11:33 सकाळी

 3. आपण एखाद्या चांगल्या मूड मध्ये असतानाच नेमकं हे “निकाल” प्रकरण म्हणजे भावनिक शॉकच ! आबासाहेब गरवारेची एम एस्सी ची प्रवेश परीक्षेचा निकाल लागला तेव्हा मी भरत नाट्य मंदिरात “पोपटी चौकट” हे नाटक पाहत होतो! त्यावेळी झालेली तगमग तुमचा अनुभव वाचून एकदम डोळ्यासमोर उभी राहिली. त्यावेळी होणारी फोना-फोनी आणि तो सगळं टेन्स माहोल! पण त्यातसुद्धा एक आगळाच आनंद आहे 🙂 अरे तुमचा अभिनंदन करायला विसरलोच – अभिनंदन…

  सप्टेंबर 12, 2012 येथे 8:33 pm

  • .

   आभार मयूर.. जिवंत अनुभवाने जिवंतपणा लाभतो आपल्याला..नाहीतर पाचकळ पसारा चालूच राहतो आयुष्यभर.

   सप्टेंबर 13, 2012 येथे 7:18 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s