खबरबात

जीवनाच्या कोलाजात आणखी एक भर पडली. गुळगुळीत म्हणावा तसा प्रवास लाभेल आणि त्याकरता अत्यावश्यक असे घास खावे लागतील, त्याच सरशी विचार विनिमय-प्रक्रीयेचे स्वरूप म्हणून इथे, तसंच मनात उमटणारे उष्टे-खरकटे बघून आता वाचणारे हडबडतील. जीवनाच्या टोकाशी सर्रकन जाता येत नाही, तिथे जावोस्तोवर अनेकातील अनेक काटे सलत राहतील. कुठलासा ठिपका घेऊन मी हा ब्लॉग लिहायला घेतला, आणि नकोसे वाटणारे वादळ मनात बनायला लागले. कसचं काहीच नको, वादळही आणि जीवनही.. माहित आहे मला, किती नकार भावनांचा घंटा-घोष लादून घेतो आहे, शुभ-घडीतल्या शंखरवात..  जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, म्हणून मी नकार घंटेला जोडलो आहे, कुणाच्यातरी कृपेने. ब्लॉगिकरण निदान नावेचे शीड उभारून देते, वारा नेईल तसा मी लिहित राहीन. विद्यार्थीदशेला ऑफिशियली रामराम ठोकायला मला उगाच किती उद्वेग भरून येतोय, आता. मी काहीच कसे केल्याचे आठवत नाही, तरी कसली ओढ आहे तिथली.. भर दुपारी थिजत पायी चाललेलो बँकेत.. पाऊसाच्या रिप-रिपीत त्यालाच ऑफिसच्या काचेतून एकटक पाहिलेलो..कधी कॉलेज -ऑफिसची पायरी एकचं सारखी भासलेलो, नक्की कुठे आहे, हे न कळालेलो,…अशी संधीप्रकाशातली चित्रं सरकली कि, खाचखळग्यात अडकलेली माझी प्रशस्तीपत्रकं मला दिसतात.. मग काही डोक्याला शीण आणणारी धावपळीचे तंतू, बस्स.. इतर अधिक काही लिहू शकत नाही, तिथल्या बद्दल. मी करतोय, मी करतोय असे बडबडत मी आता पोहचलो तिथे डायरेक्ट वर दोर नसणारी खूप खोल खोल जाणारी लिफ्ट, मी न काही करता..कोण मला कुठे ढकलतेय, काहीच पत्ता लागत नाहीये. सीतेला धरणीमाय ऊर फोडून घ्यायला आली, तशी काही कहाणी-प्रयोजन आणि महत्त्व मला इथे कुठे दिसत नाही. अंतरातल्या ओळखीचा सूर अनेकवेळा आळवून आळवून मी पूजा बांधू शकेन तर तसली मीरा माईची खोल गर्तातली परिस्थिती मला मागून-भांडून सुद्धा मिळणार नाही… नागमोडी वळणांचे जीवन कसे सरळ जात नाही, म्हणून मी सरळ रस्ता पायाखाली आणायचे कधी ठरवत असतो, तर वळणांना कधी सरळ बघण्याचा प्रयत्न करत असतो.

चार दिवसांत एक शहरवारी घडली, मनात साठलेले शहर समोर कधी दिसले नाही, मग अशी वारी घडेलंच .. आपण मनाचे कोपरे शहरात सांडत असतो, मग परत ते भरतांना तितकेच राहत नाहीत, जोड-विजोड होतेच. असो, त्या शहरात गोतावळा इतका होता कि, मला सारेच माझे सख्खे नातेवाईक वाटत राहिलेत..शिवाय मराठी चेहरा-मोहरा-पट्टी चिकटली होती, पण त्या महिरपी शोभतील अशी मांडणी. वृक्षांचा विलक्षण वावर होता.. इतपत, कि मी तरी त्यांच्या मागे लपलेले हिरवे(च) सूचना-दर्शक पाहू शकत नव्हतो. मला नाते जपणे खरोखर कठीण वाटते, मलूल चेहरा न करता आनंदी भासवत त्यांचे जीवन आपल्या जीवनाशी जोडत राहणे, म्हणजे एक मोठी तारांबळ उडत असते.

आज लिहीन म्हणून काहीसं ब्स्त्राक्ट झालंय.. तरी पेढ्यांसारखे गोड मानून घ्या, तसंही, मला किती गोड-गोड विषय सुचत होते, पण स्साला..मूडचा लोच्चा झाला.. परत भेटू, लवकरच.

Advertisements

One thought on “खबरबात”

  1. Poetry lies here. I got stuck here. This post made me wait, to swallow depths of your writings, your words and what not. This is a token to utter the sheer joy your writings give me. This one starts where it should, and ends where it should not, the ideal one. The flow goes, in its own streams, you let it grow so gracefully and so honestly, that whoever aligns to these writings, can find many beautiful places, where he can touch, sense, linger being a part of flow, your beautiful mind. Sorry, could not type in Marathi.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s