वैयर्थ जेथे उमगे सदा…

पाण्यातलं धुरा प्रतिबिंबं..

हुश्श! काय लगबग लागलीय मागे. सुस्कारा सोडण्यात वेळ वाया जातोय, असंही वाटतेय. पण हल्ली स्पर्धा वाढलीये, म्हणून प्रतिष्ठित प्रकरणं करावी लागतात, लोटांगणे घालावी लागतात..आपल्याला लोटून अंगणात हाकलेपर्यंत मरमर मरावं लागतं. एकतर प्रयत्नात सफल झाल्याचा धोस्सा लागला, त्यावर माझी मनात अशी चलबिचल सुरु झालीय, कि एका दिवसात आपले सर्व भान असे बदलत जाऊ शकते.. कुठे मी अपात्र अजबाबदार आणि आज लगेच; हे तर काय तुझा हातचा मळ, अशी भाषा?? दिवस येतो, रात्र सरते, तेच चक्र फिरत असते..मग कोण कुठल्या दिवशी उद्याचा मामलेदार होणार ते ठरवू शकणे म्हणजे तारे मोजून काढणेच, झाले. सभोवार पाणीच पाणी, समुद्राचं का कुठलं माहिती नाही, त्यावर केवळ आपलं डळमळणारं प्रतिबिंब हळू-हळू, सावकाश अक्राळ-विक्राळ होत जात आहे..ते कधी-कधी भयानक वाटू लागते… आणि तेच आपले पाहणे सुरूच राहते, ना शेवट ना सुरुवात फक्त पाहणे.. इति रूपक माझं स्वस्थ मन स्वस्थतेत करतं. ते मी उलगडू पाहतो, माझं प्रथित यश माझ्या संथ जीवनाला धक्का देत आहे आणि एका मोठ्या कवेत डोकावतानाच ते प्रतिरूप मला दिसतेय.. हम्म होईल अशी फेज शांत काही दिवसांनी, पूल पार करण्याचा अवकाश.. कॅम्पसचा काळ ओलांडण्याचा अवकाश.. हा अवकाश मला फार आवडतो, फक्त नावापुरता.. दुरून पाहण्याकरता. तो पेलण्यास घट्ट मन यथावकाश तयार होईल, याची खात्री आहे.

Advertisements

9 responses

  • .

   हि गोष्ट चांगली का वाईट कशी माहित नाही, पण आनंद मानण्याइतकी आहे.. आपणां सर्व खो’करींना..

   जुलै 31, 2012 येथे 1:33 pm

 1. पिंगबॅक मम हृदयी आत्मप्रत | दुरितांचे तिमिर

 2. जवळपास सगळ्या पोस्ट वाचल्या. अभिजीत ताम्हणे ची सारखी आठवण येत होती वाचतांना. म्हणतात ना, की नाव जरी बदललं , तरी लिखाणाची शैली काही बदलता येत नाही. असो. शुभेच्छा.

  सप्टेंबर 26, 2012 येथे 5:52 pm

  • .

   आभारी आहे, सगळ्या पोस्टच्या कोटीच्या कोटी उड्डाणे केल्याबद्दल.

   म्हणतात ना, की नाव जरी बदललं , तरी लिखाणाची शैली काही बदलता येत नाही. असो. शुभेच्छा.
   — हे काय म्हणताय काय, सपशेल माफ करण्यालायकही वाक्य नाही हे.
   मी त्या अभिजितरावांसारखे लिहित असेल, पण तो मी नव्हे. ते लेखकराव त्याच्या ठिकाणी, मी माझं लिहितो, कृपया गैरसमज नसावा, तुम्हांला त्या अभिजीतची इत्थंभूत माहिती आणि इतिहास माहित असेलच.
   त्याची आठवण येत असेल, तर तो त्याचा प्रभाव..त्याने त्याच्या तकलादू व्याख्या माझ्या डोक्यात भरवल्यामुळे, मी लिहिले तर कसे वाटेल वाचकलोकांना; या त्याने ठरवलेल्या पद्धतीमुळे.
   बस्स, माझ्यावर त्याची इनमिन दोन वाक्यं आली आहेत. पण त्यामुळे तुम्ही हा गैरसमज दृढ केलाय काय?
   त्याची एका सोमवारी न येण्याबद्दल दखल एकुलती एक मी घेतली म्हणून गैरसमज वाढवतायेत का?
   पहिले म्हणजे तो ब्लॉगर्सबद्दल काहीही लिहेन, कसं लिहतोय ते तुम्हांला चांगलंच ठावूक आहे. आणि दुसरं असं कि आपण ब्लॉगर्सनी मुकाट ते वाचून ब्र न काढता राहायचे का?
   माझ्या मुखपृष्ठावरच यावर लिहिलंय, जाहीर विरोध नाही पण तरी छुपा वार केलाय, तरी तुम्ही असे कसे म्हणताय?

   सप्टेंबर 26, 2012 येथे 6:58 pm

 3. माफ करा. गैरसमज झाला होता. 🙂

  सप्टेंबर 26, 2012 येथे 9:12 pm

  • .

   ओह, माफ काय, अस काही नाही हो,
   मला माझी बाजू मांडायला हवी, म्हणून बोललो तसे.. तो अभिजित नाही येणार इथे, आणि म्हणणार कि मी दुरित नाही ते. ते माझं मलाच बोलावं लागणार. असो. किती जिव्हारी लागतं असं बोलणे ते तुम्हांला काय कळणार, बाकी.

   सप्टेंबर 26, 2012 येथे 9:34 pm

 4. कदाचित तुमच्या ब्लॉग रोल मधले ब्लॉग पाहून असेल. 🙂

  सप्टेंबर 26, 2012 येथे 9:23 pm

  • .

   आता मी काय बोलणार? प्रत्येकाचे बघणे एकेक.

   सप्टेंबर 26, 2012 येथे 9:35 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s