वैयर्थ जेथे उमगे सदा…

तर्तरणारं जीव

मेंबरच्या शिपमधून फिरायला निघण्यासाठी फॉर्म भरला. बँकेत नवं-नवं अकॉउंट उघडलं गेलं. एम. कॉम चे फॉर्म भरले. सही सही, माझी सही फिक्स झाली, आयसीएआयच्या आयकार्ड रजिस्टरमध्ये आता. जुन्या पुरान्या सर्व (चारच) मित्रांना नवीन नं. देऊन, आठवणीतल्या कित्ती गोष्टींना उमाळे देत बसलो. संवेदने लोकसत्तात उल्लेखाबद्दल कळवलं, अगदी त्याच्या स्वभावाने मी भारून गेलो. खो च्या निमित्ताने नवीन अवकाश भरभरून पाहिले. जीवाभावाचे असे शब्द सुचू लागतात, खो-खो करीं साठी. लोकसत्ताने ब्लॉगच्या धुमारांना पकडण्याच्या प्रयत्नात अवचित आमची दखल घेतली, आम्ही नसण्यात असणे; याची ओळख लोकसत्ता वाचकांना करून दिली. माझ्या सरळ ओळख समोर न ठेवण्यात, आणि ब्लॉगचे स्वरूप अडनिडे राहण्यात माझे आणि सभोवारचे परिपोषण आहे, पण त्याला ब्लॉग माध्यमात काहीच महत्त्व नाही..माणूस माणूसपणात व्यक्त होत जातो, होत राहणार.. मग ते पारंपारिक अभंग रचनेतून, आणि आता ब्लॉग बांधणीतून असो, खर्‍या तळमळीतून इको साउंड्स ऐकत राहणे, हा जुनाच खेळ. समाधानाच्या काही जागा या जगात अजून आहेत, म्हणून माणूस जगत आहे,.. त्या जगात तोशीस पडली तर समाधानासाठी नवीन जग निर्मावे लागेल.

सुरक्षितेत वाढणारे माझे जीवनमान वेगाने नवीन आयामाने वेढून निघते आहे. आतापर्यंत, मी कोशाच्या पल्याडला आतून पाहण्यात धन्यता मानत होतो, आता पल्याडच गाठायचे आहे. कोशाची चिंता वेगाने जशी निघून जाते, तितकीच ती भरून येत आहे.

जाता राहिला, व्यक्तींतला व्यक्तपणा मी मराठीत खरंच अनुभवला.. माझे सर्व मराठी संवादावरचे दोषारोपण हे तुम्हां-आम्हांची निव्वळ भरकट होण्यासाठी माझ्या असमग्रतेमुळे झाले.. सोप्प, असे कि माझी ती वायफळ बडबड होती, त्यासाठी खरोखर माफ करावे.     

Advertisements

One response

  1. पिंगबॅक आई काळजीत होती | अंतर्नाद मनाचे… मनातील प्रत्येक भावनेचे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s