वैयर्थ जेथे उमगे सदा…

मनातलं बोलणं…..कठीण.तिरीप १

मागे म्हटल्याप्रमाणे, मनाच्या अमूर्त गाठी इथे सोडता नाकीनऊ येतात. मनाचे बोल हा सुगम प्रकार शारीरिकत्वाच्या पातळीवर वाटतो. कधी तो मस्कीरीने उडवला जातो. एकंदरीत, हे आणि ते बोलण्यात मन कुठे गुंतत नाही. मेंदूचा कुठला कोपरा बोल सोडून जातो, आणि तिथे मन घुसते लुडबुडायला..प्रकरणावर पडदा टाकल्याचं, उगाच तो टांग्ल्यासारखा ते उभे! वर, पूर्ण सोडत न झालेल्या लॉटरीसारखं लटकणारे हे मन ‘काय घेणार यातून’ असं म्हणून कडी-कुलूप लावून बसतं. दुसरी गोष्ट अशी कि, मनातले बोलणे-लिहिणे, ‘त्यातून ते बाहेर काढणे’ करणारे कमीच; कठीण म्हणून.,आणि पहिली म्हणजे जिथून पुढे, ते काठीण्य पार करावे लागते, ते काठीण्य आधीचं आपल्या मनात वसत असतं, म्हणजे आपल्याला खरोखरचं काहीच कळतं नाही, नक्की मनात क्काय चालू आहे..? आणखी तिसरी गोष्ट अशी निघते, कि हे सर्व कठीण प्रकार बाहेर आल्यावर बाहेर असलेल्यांना कळतांना कठीण जाणार आहे, ही. या तिहेरी टप्प्यांना भारीय्य असे विशेषण लावू शकत नाही, कारण कोणत्याही निकालात लगोलग ते जात नाही, टप्प्यांना गोल-गोल वळणांची खाली आणि वर एकाच वेळेस जाणारी शिडी टेकवून लावलेली असते. तिथल्या तिथे मार्ग निघाला असता, तर जोरात श्वास घेऊन, कमरेत वाकून आणखी जोरात भारीय्ये, असे ओरडता आले असते.

‘थोराचे मन साफ, बाकी सर्व माफ’ असली सामान्य मनाला कुरतडत जाणारी वाक्यं कुठून निघाली, निरीक्षण नोंदवत, कोट्या पाडत, कोणते असे थोर झालेत. भावनात्मक, आणि न सहनात्मक विचित्र शब्दांचे फेरे मनात येत असतात, बाहेर आल्यावर ‘ते मनाचे असतात…’ अशी साधारण बोंब होऊन जात असते. प्रामाणिक मन हा भरजरीत वैषयिक असतो, कुठल्यान कुठल्या समारंभाच्या, समारोपाच्या प्रमुख पाहुणे, अधिकारींसाठी… काय दर्शन आहे, वैषयिक निवेदनार्‍याला इति अधिकारींच्या मनाचे पारदर्शी पदर उलगडण्याचे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s