मनातलं बोलणं…..कठीण.तिरीप २

समारंभ आणि समारोपाचे तुम्हांसाठी निष्कारण उमजणे केले, कारण मला अश्या स-प्रसंगांत मनाचे संबोधन प्रकार तिटकारा आणण्याशिवाय राहत नाही. आता, समाज मन असं म्हणतांना आपण आपल्याच मनात समाजाचे जे प्रतिबिंब पाडले असेल, तेच म्हणत असतो. या समाज-मनांचा समाज तयार होऊन हे भव्य दिव्य विश्व रचले आहे, चालले आहे.. पुढे जात राहील. राहील, या क्रियापदाने माझ्या मनात राही अनिल बर्वेची, आठवण झाली (अनिल बर्वेंची थोडीशी), त्यांची कथानकाची अद्भुत पद्धत काही क्षण बुद्धीत निरंतली(?)…आणि प्रतलांना छेदून टाकणारी पात्रं आठवली. बरे, पुढे जातोय, मनोकायिक का भलतं हेच इथे लिहिण्यातली खरी मेख आहे, कारण निदान माझ्या मनाचं कठीणत्वं तरी पार भेदून तिकडे जायचं आहे. कायिक काय असेल, ते असो..

पण माझ्या मनाला एक शरीर कल्पून आणखी गोंधळात टाकणारी अवस्था मी मनात तयार करतो.

त्या शरीराला काही लागतं, खुपतं..हे मात्र मी या शरीरावर सोपवायला जातो, तर त्या मनाच्या शरीराचा वेग इतका भन्नाट असतो,

आणि ते सारखे गरगर अनेक विषयांना हात लावून फिरत असते, त्याचे खुअपणे.. कधी लपणे होते, तर कधी त्याने डोक्यावर रान उठते..

लागते ते सरळ दिसत नाही, लपून बघितलं तर, समोर धाडतं,

त्याचे रूप बुद्धीत निर्माण करतांना खूपशी चलबिचल होते…जराशी फट राहिली बांधतांना तर, त्यातून वारा सर्र निसटावा तसे निसटते..

हम्म, आता, ‘हेच कि आपण वाचतोय, मनात मनाच्या शरीराचे डोळे वाचताय आपल्यापेक्षा अतिशय वेगात..मनाच्या शरीरातल्या बुद्धीत या खर्‍याखुर्‍या शरीरासाठी अगम्य अर्थही लागतोय, तिथेच..कधी क्षणार्धासाठी तो चमकतोही, पण आपल्या मंद जड शरीराच्या बुद्धीत तो कधीच चमकून गेलेला प्रकाश सावलीतही उतरत नाही.’ ह्या माझ्या बुद्धीने स्फुरलेल्या,स्पॉन्सरलेल्या मांडणीकरता मनात मी अगदी तळाच्या खारट पाण्याचा एकांश जरी शिंपडला असला तरी, त्या मनात वर अथांग सदोदित प्रकाशमान तळात काही खळबळत नाही.

डुक्कराचे दोन डोळे, आणि हत्तीचे कान आणि वर उंदराची शेपटी असं कोलाजाच्या अंगाचे शरीर योग्य..त्या मनाच्या कायिकास… चूक अशी गोष्ट (….ह्मर्र,थिंगला मराठीत काय म्हणतात?!) नाहीच जगात. प्रतेय्कजण आपल्या मनात घोडे लावून बरोबर असतो..अगदी निसर्गही(..विसर्गही पावसाचा..)
कुठला थोर आदिमानव होता कि त्याने, चूक ही संज्ञा निर्मिली..खरंच तिथूनच या भ्रष्ट आचाराची (भ्रष्टाचाराची!!सध्याच्या भाषेत ही जोद्याक्षरे आहेत हे कुणी मान्य करणार नाही!) आणि पर्यायाने आपल्या भारताच्या सद्य राजकारणाचीही.. अथश्री झाली.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s