वैयर्थ जेथे उमगे सदा…

खोटं खोटं गीत मैं तेरे लिए…

‘आशिक बुरे होते हैं..’ माझ्या जंतू मित्रांतला सर्वात ज्येष्ठ जंतू, आज माझ्या कानात कुजबुजला. अश्या एकेक जंतू मित्राची ओळख तुम्हांला ‘आज’च्या लेबलखाली कधी ना कधी होईलच. आज, हा आला, दुखणी काढत बडबडत राहिला.. जंतू मित्र टर्म कशासाठी हा आटापिटा तुम्ही करायचाय. वेळेच्या दोन कमतरता आहेत, एक तो पुरत नाही आणि दोन कि तो पुरून उरतो. (पाचकळ) गाणं वाजलेच कि वेळ पुरत नाही (सहन होत नाही), आणि (आस्वादक) गाणे ऐकणे आले कि वेळ पुरून उरतो (नितांत ऐकावे वाटते), इतके काही हे साधारण सर्वलागू कोट नाही, म्हणजे काहींना जेव्हा जोराची भूक लागते, तेव्हा वेळ हातातून चटचट पळून जाईल..(वेळ पुरत नाही) आणि पोट टम्म भरले असेल, तर तेच खाणे वेळकाढू बनू लागते..एक एक सेकंद जावा लागतो (वेळ पुरून उरतो). तर कधी कधी दोन्ही भाव वेळ एकाच वेळी दाखवतो. भरभरीत आणि पाचकळ प्रास्ताविक झाले म्हणून फार गम्यता आली नसेल; तर सांगतो अठावन्न वय वर्षे मला येऊन भेटतात, वेळ माझा पुरून राहतोय आणि त्यांचा तोच वेळ सर्रकन जातोय, शिवाय त्यांना त्यांच्या किती कोण जाणे बाकी असलेल्या नोकरीच्या कामगिरीवर लगोलग जायचे आहे, त्या दरम्यान काही ते करत आणि असली आशिक,सारखी वाक्ये बडबडत…धन्य…. जंतू आता डोक्यात जाण्यासाठी आणखीन क्ल्यूज लिहून जात नाही..

एक, पुरून उरण्याची कल्पना मला कधी आवडली नाही. त्याने मागितले मग मी दिले तर माझ्याकडे उरले काहीच नाही, त्याला पुरले नाही तर माझे दिले…म्हणजे माझ्याकडे पुरून उरले होते का?? तर्काचे तंतू विणणे माझे काम तर नाही, पण त्या तंतूंना विस्कटून गुंता वाढवणे ही करामत मला जास्त करता येते. दोन, समाधानाचे धनिक बनणे हे अशक्य आहे, वाक्य गुंफतो मीच आणि ते तोडतोही मी…समाधान मोजणे म्हणजे धनाची रास मोजण्यासारखे आहे, आणि त्यातून समाधानाचे धनिक तुम्ही बनू शकता; हम्म म्हणाल आला मोठा, तर नेटाने बघाल..कि मी इथे समाधान शोधतोय, हिंडतोय त्याचकरता.. ते इथे नसेल, कुठेच नसेल मग असेल काय.. मी एक शोधक एका रानात..रानसुद्धा हिंडत्या प्रकारात, वाट चालतोय.. चालण्यातले सुख-आनंद-दु:ख-यातनाने बघे बनण्यात समाधान मोजू लागतो…आणि ती समाधानाची रास धनासारखी वर चढू लागते. जितके समाधान मोजता आले, ते अ-धनासारखे..आणि न मोजलेले क्षण-समाधान यांची वर्णी समाधानाचे धनिक बनण्यात असणार..भयंकर लॉजिक-कल्पनांचा खेळ खेळलो..पण जाऊ द्याच., आणि मला राहू द्या, न मोजता येणार्‍या समाधानाच्या कुशीत…

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s