सारे सारे
कळू न देता

कर्कश्य आठवणी माझ्यात तुझ्या
खूप सारे गोड हळुवार कातर होते त्यावेळी
अन् वेडावूनही जात
आज कोण प्रलय कळा विवरित त्याच वेडया करीत आहे.

अनुदिनी
आज दिवस ठीक गेला. पेपर जरा मस्त गेला म्हणजे लिहिला बर्‍यापैकी. सकाळी उठलो ठीक, आंघोळ केली अन् कॉम्प्युटर लावला तर जरा बाबा बोलले. पटापट भीमरूपी म्हटले पण मला माहिती होते की साडेनऊची बस काही भेटणार नाही आपल्याला, जरा वाचलं P.C. वरचं,E-Commerce चं. आज पासून ठरवलंय की डायरी लिहीयाची म्हणून, आकाश जरा मस्त वागला आज, जे वाचलं त्याने आणि सांगितलं मला तेच सर्व आलं ठीक, पेपरला पाच मिनिटं राहिली सुटायला तेव्हा दिला, मध्ये दहा मिनिटापूर्वी ‘तो’ दिसला आज.घरी आल्यावर जेवण, टीव्ही बरा पाहिला. झोपलो साडेसहापर्यंत. मग नेट लावला आज, परत टीव्ही बाकी जेवण केलं, रामरक्षा म्हटली वेगळ्या पद्धतीने त्याच्या पहिले मराठीचं वाचतो थोडं, पण झोप येतेय पण वाचतोय. मंदार पण ठीक, आज decisive and aggressive वाटला तो मला!
आज म्हणजे आता काल झाला कारण मी 3 ला लिहितो हे सगळं.
सकाळी परेश सरांचा फोन मी आंघोळीला गेलो असताना आईने उचलला, नंतर हो-नाही करत मी फोन लावला, चौकशी केली, 5 ला दुपारी फोन करायला लावलाय. नंतर साडेनऊची लेट झालेली बस पण माझ्या नेहमीच्या वेळेला आली. कॉलेजला धाकधूक वाटत होती.पेपर लिहायला बसण्यापूर्वी इंग्लिश-मराठी सरमिसळ चर्चा झाली. बसलो लिहायला.. दोन प्रश्न-पत्रिका छापून आलेल्या, त्यातली नव्या अभ्यासक्रमातली केली सोल्व्ह. तीच होती आम्हांला. पेपरमध्ये झोप येत होती. ठीक गेला, दहा मार्कांचं लिहीलं नाही, कसातरी दिला बा एकदाचा. खाली आलो योगेशचा नंबर घेतला. जेनिसचा अंदाजच घेत होतो. आकाश आला, आदित्यही व बाकी जमले. हरीशला फोन लावला सकाळच्या घडामोडींबद्दल, दरम्यान जेनिसनं पाहिलं असावं मला.. चालत चालत पुढे गेलो., एका क्षणी आम्ही दोघांनी एकमेकांना पाहिलं बस्..नंतर आदित्याकाशला भूक लागली. गेले नक्षत्रात, मी आलो निघून.
*रामचं वाचलं थोडंफार, राम बर्‍याच टेन्शनमध्ये आहे. आज आई बाबा खुश आहेत.
पुढचा दिवस
बस् आज कालबद्दल पुढे लिहिणार, नंतर रिक्षे-रिक्षे घरी पोहचलो. पोहोचल्यानंतर ते आज 3 च्या सकाळपर्यंत बस्स रडतच राहिलो. केवळ त्याच्या आठवणीने, P.C. वर ‘भय इथले..’ सारखं ऐकत राहिलो, वर गच्चीवर गदागदा रडलो. नंतर राम आला साडे आठला. जेवलो पटपट पण डोळ्यातून पाणी सरत नव्हतं, रात्रभर अभ्यास केला, आणि आज उठलो. राम गेला होता कॉलेजला. मंदारची बिनदिक्कत परवानगी होती मला नेट लावायची.. ऑर्कुट लावलं..इतर WYAN, Gmail, yahoo उद्योग केले, आंघोळ केली, अभ्यासाचं नाव नाही तरी, बर पुढे जेवण पुरी-छोले असं काही. अभ्यासानंतर झोपलो, उठलो, दुध प्यालो. आई म्हणे उद्या पिक्चरला; म्हटलं का. नंतर दत्तमंदिराला आई-बाबा, वाटेत त्यांना परेश सर दिसले. मी जरा तो, टाईम पास, टीव्ही करत राहिलो, रामरक्षा म्हटली. राम आला, जेवलो, अभ्यास करतोय आणि आता लिहतोय, बर महत्त्वाचं सकाळी गणेशचा फोन, स्वप्नील व हरीश बोलले खबरदारीबद्दल..
संगीताबद्दल छान चर्चा झाली, जीवनात काही करण्याची-राम,मंदार व मी
वैभवशी बोललो… रविवारी क्लास असणार,…बरं आता उद्याचं, झोप येतेय..

यही जिंदगी है तो क्या जिंदगी है
…..ट्ये.सि. चित्रपटातले हे गाणे,..
नामाहून निराळे,
तास न् तास जिव्हाळे,
चणचणीचा विषय
विस्फारणारे काळीज…
जर लैंगिकतेचा अनुभव नंतर कीळसवाणा वाटला नसता तर,
त्या लैंगिक सुखाला पारावार उरला नसता,

(आजचा जंतू)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s