वैयर्थ जेथे उमगे सदा…

स्वपिडू जंतू

प्रिय अमोल (कुंतल),
हे पत्र आपलं शेवटासाठीचं, तू काय म्हणशील, तुला काय म्हणायचंय ते सगळं कळतंय मला काहीसं, आपला बंध तुटण्यास मी कारणीभूत आहे हे स्पष्ट आहे तरी ती कारणे कधी समोर आली नाहीत. असो, मी हे सर्व लिहिताना मरण्याचा दिवस का रात्र आठवत राहतोय कि अखेर होणारी गोष्ट कशी घडेल…

दु:खाने ओसंडून वाहतोय तू…माहित आहे मला, दोन फुलांची पाकळी लाभलेल्या दोन भयाण जागा एका सौदागाराप्रमाणे तू पाहिल्या.व्यवहाराची जाग असली तरी धंद्याची चण लाभलेली नाही रे मला, पण व्यस्त प्राण्यांप्रमाणे नीटसं न सांगणारा असेल मी , ती चूक वाटत असेल तुला. असो, बेफिकीर नसेल तरच तू चौकटी मांडण्यापलीकडे पाहत नाहीस, ‘मागायला हवेच असे काही नसतं’ असे जग कधी सांगत नाही!

हेच ते शब्दजंजाळ सारखे तुला बिनसावयाला लावणारे, खरोखर पटत नाहीत माझे शब्द तर त्या शब्दांपलीकडे तू कधी गेलास, पाहिलं मला माझ्या शब्दांना ओलांडून.. तर तुला कधी मी मोकळं बोलत नाही अशी तक्रार करता आली नसती. पण माझ्या सुशोभित शब्दवनात तू फिरत राहिलास आणि माझ्या सुंदर पुतळ्यासमोर बोलू लागलास, अरे तू तरही दगड आहेस आणि फिरून कधी तू दगडाला तडे लागतायेत का ते बघू लागलास…दर प्रसंगाला बदलणारा मी दिसलाय तुला, कदाचित. त्याही पलीकडे अश्रू ढाळत राहणारा तुला कधी दिसणार नाही, कधीच नाही.

मी इथे माझी चिकित्सा करत राहतोय, असं वाटेल तुला, आणि काही सांत्वनपर गोष्टी मांडतोय, असंही…

तुझ्या निराशेचं कारण मला कळलं असं मी म्हणणार नाही पण जाणीव आहे त्याची.
इतकी संवेदनशीलता आहे मनात की तू निराश आहेस माझ्यामुळे…
तुला माझ्याकडून काही मिळत नाही आहे
की
मला तुझ्याकडून काही नाही, तर यात पहिलं मला वाटतं की; त्यासाठीचं हे सर्व घडतंय.
खरं तर काही सांगायला नको, राहू नये असं जेव्हा राहतं; होतं तर खरं प्रेम होतं. न बोलणं जिथे पाप मानलं जातं तिथे प्रेम कधी असू शकत नाही, मीही आता माझ्या अश्रूंची उच्चारणा उगाच, केलीच; केली नाही पाहिजे होती, जरी कितीही जबरदस्ती आली असती तरी. पण प्रश्न खर्‍या प्रेमाचा आहे, नाही; आता होता.

This slideshow requires JavaScript.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s