वैयर्थ जेथे उमगे सदा…

मार्कांची चाळण

माझ्या भाग्यशाली (मराठीत लकी) मार्कांचे दर्शन घडवतो….या आधीच मी तसे वरवरचे सांगितले आहेच. आता, चाळीस हा आकडा आम्ही (सीए जे कोणी करत आहेत  ते सर्व, अर्थात त्यांना या आकड्याचे महत्त्व सांगायची गरज नाही.) एखादाच विषय पास होण्यासाठी भावभक्तीने (का भक्तीभावाने?) पुजतो..तो मला भगवान के कृपा से निकालात तीन-तीनदा रिपीट झालाय.. ते नाही का, सीरियली मध्ये तीन-तीनदा कॅमेरा फिरवून तो सीन पास करतात, तसा मला हा चाळीस आकडा पास करून गेला. नाहीतर, हे तीन चाळीस पावले नसते तर माझी खैर नसती..आणि मला उगीच नैराश्याचा उमाळा आला नसता. बरे, त्याही पुढे मला, एकात त्रेचाळीस आकडे देऊन पुन्हा तीन चाळीसची आठवण करून देण्यात आली. होता होता हातोहात चार विषयांची मार्कावली मी सांगितली. पाचवा जो मला गैरलागू आहे, तो मोजावा. अग्रक्रमाने आता राहिलेल्या तीन विषयांपैकी ज्याचे मार्क सांगावे त्या विषयात मला सत्तरहून एक कमी असे पडलेत. आणि त्यानंतर उतरणीत पन्नासहून सहा जास्त, व पन्नास असा क्रम. मी जाणीवपूर्वक आठही विषयांचे नावं तसेच त्याजोडीने येणारे त्यांचे मार्क असे संबंध तोडलेत, असे म्हणू नका..तर तशी मुस्कटदाबी मला हर क्षेत्रात करुन प्र्यो फ्ये श्श न् ली झ म गाठायचा आहे, तीव्र तिटकारा तत्क्षणी (क्ष)तिरला तुमच्या मेंदूत, नाही? असो. जे काही होवो, मी आयसीएआयप्रमाणे विषयक्रमिक मार्क न सांगता वर सांगितलेल्या संगतीबद्ध(?)प्रमाणे विषय सांगतो.

Financial Reporting

Strategic Financial Management

Information Systems Control and Audit

Advanced Management Accounting

Corporate and Allied Laws

Indirect Tax Laws

Direct Tax Laws

Advanced Auditing and Professional Ethics

तसा आणखीही प्र्योफ्येश्शन्लीझम करायचो म्हणतो!
– एक पासवर्ड प्रोटेक्टेड पोस्टमध्ये मी रीझुमे (कित्ती गोड शब्द वाटायचा मला, आत्ता-आता पर्यंत!) अपलोड करायचाय, हा.

तरी, मला आपली जाणकार मतं कळवा.

Advertisements

4 responses

 1. आल्हाद alias Alhad

  आपण भरपूर मार्क्स मिळवलेत. अभिनंदन. रीझुमे पासवर्ड प्रोटेक्ट करावा लागण्याची गरज का बरं जाणवावी?

  ऑगस्ट 12, 2012 येथे 11:49 pm

  • .

   सर्व-प्रथम आपले धन्यवाद, मार्क्स हे निमित्त झाले; पण काही एक बोलणे वाढावे हे यामागचे सर्व-प्रयोजन होते.
   गरजेबद्दल-रीझुम्ये मांडावा ते पण सर्वतोपरी ओळख झाकलेल्या ब्लॉगवर, काहीएक न-खुण सोडली आहे मी इथे; मग री-झुम सढळ टाकणे म्हणजे दाढी खुंटून नकली दाढी लावणेच झाले..
   जो मागेईल (कायये, माझ्या मराठीधरून सर्व भाषा कच्च्या आहेत.) तो नावासहित माझी ढ ळ ढ ळी त हलाखीची स्थिती बघू शकतो.
   आणि तो खुलासा दिलखुलास नसेलही; मी जुनाच कुणी ब्लॉगर सिद्ध होऊन जाईल (नवाही नसेल).
   माझे ब्लॉग आणि व्य व सा य जोडणे याला मी पासवर्ड प्रोटेक्ट (सर्वतोपरी ओळख झाकलेले) म्हणतो.
   क्षमस्व, असाधारण उत्तराबद्दल.

   ऑगस्ट 13, 2012 येथे 12:50 pm

   • आल्हाद alias Alhad

    अच्छा असंय होय!

    ऑगस्ट 14, 2012 येथे 4:10 pm

    • .

     होय, आपण बघाल का..?
     काही अद्ययावत झालंय..

     ऑगस्ट 14, 2012 येथे 4:16 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s