वैयर्थ जेथे उमगे सदा…

आजच्या घडीला

आताच्या काळात मला वेळ कसकसा घेऊन निघून जातोय, कळत नाही.

आल्हाद यांच्या आल्हाददायक प्रतिक्रियेतून मी आता लिहितोय.

तर, दिवसांचे रकाने ब्लॉगवर भरणे जसे थांबले तसे, मी ब्लॉगरच्या भूमिकेतून जगाकडे बघणेही थांबले. काल हलकीशी इथली चाहूल घेतली, आल्हाद प्रतिसाद देतोय म्हटलं मग सविस्तर माझेही इथे काही लिहून व्हावे. त्यासाठी, मी कालच्या एका कार्यक्रमाची निवड केलीए; इत्थंभूत माहिती तर नाही म्हणता येणार पण माझे ठळक उसासे मी इथे निवळण्याचे ठरवतो.

मानस शास्त्र या पठडीतून अभ्यासलेला, ताण-तणावांचे विच्छेदीकरण यावर भावी प्रबंध मांडू इच्छिणारा, आजच्या घडीत तिशीच्या आसपास असू शकणारा तरुण, त्याच्या स्मृतीपित्यर्थ एक संस्था त्याच्या मित्र-जनांनी, शिक्षकांनी, आई-वडिलांनी उभारली. त्या संस्थेचा हा खास वाढणारा पहिला कार्यक्रम. त्याच्या वडिलांचे दु:ख त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होते. त्याने ताण-तणाव संदर्भात सांगितलेले अविस्मरणीय नोंदक त्यांनी आम्हांला प्रसृत केले, ते असे, ताण-तणाव हा व्यक्ती-व्यक्तींपुरता मर्यादित असतो, एकप्रकारे स्वार्थी असतो. त्यास उदाहरणादाखल तो म्हणतो कि, ड्रायव्हर गाडी चालवण्याच्या टेन्शनमध्ये असतात, आपलीच गाडी कशी पुढे जाईल, गाडीला कोणत्या प्रकारे आपण हाताळू शकू, आपल्या मार्गात कोणते अडथळे येताय, इत्यादी याच ताण-तणावात ते वावरत असतात, म्हणजेच असेच झाले ना कि आपले सर्व टेन्शनांचे मार्ग आपल्याचकडे आणि आपल्याच दिशेने वाहत असतात.

याच कार्यक्रमात श्रोते-प्रेक्षकांना नाश्ता बसल्या जागी दिला, समोर मान्यवर बोलत असतांना हा प्रकार मला एक मोठा पराक्रम वाटला. बराचसा संथ चालत असलेला हा कार्यक्रम प्रमुख व्यक्तेंनी बोलायला सुरुवात केली तेव्हा, तर त्यांची इतकी सुसाट व्यक्तशैली झाली होती; मी दचकून इतरत्र पाहिले, कि मी त्याच कार्यक्रमात आहे का म्हणून.

सायकोलॉजी मध्ये रिसर्च करणारे, खूप गाढ अभ्यास करणारे शिक्षक होते. तो असता, तर मला अजून जवळून कळली असती टोटल रिसर्चोलॉजी, युवा लोकांची रग त्याने व्यवस्थित पकडली असती. असो. अफसोस करण्यापलीकडे माझे दुसरेच आडाखे शिजत असतात मनात. माझे मन हा इथे माझा संशोधनाचा विषय आहे, हे मी आता डीक्लेअर करतो.

आणि, आता जेन्युअन आल्हाद शी हितगुज…..

कूट असाधारण असणार हे माहित असेलच, तरी शरण आलोय असे बोलणे केलेत, बाप रे मी उडालोच! आता मी सांगणे-न सांगणे ही निव्वळ कसरत झालीय. काही फुटकळ गोष्टीं सांगून स्वार्थ साधणे याचा तिटकारा आलाय. व्यक्त-अवयव म्हणजे हाच माझा ब्लॉग. बाकि, ते सारे अव्यक्तातच आले असणार, आणि अव्यक्तातच जाणार…सामान्यच आहे ते सारे आहेत तसे. फक्त मी कोण होतो, तर पुढे या ब्लॉगनेच मला निराळेपण येणार.
जहाजावर एक माशी उडत राहते. तसे बरेच तिचे साथीदार होतेच. पण सांगायचे तर तिच्याबद्दलच का, कारण ती या इथून त्या तिथून न उडता जहाजाच्या एका खलाशाला सारखी सारखी त्रास देत असते म्हणूनच.

Advertisements

2 responses

 1. या लेखावरून तुमच्या संदर्भातला माझा ग्रह दृढ झाला नक्कीच , व्यक्तीरेखा चित्रण आपल्याला उत्तम करता येईल असे मनापासून वाटते,त्यासंदर्भात वाचायला आवडेल

  ऑगस्ट 30, 2012 येथे 1:33 pm

  • .

   धन्यवाद,
   आल्हादातून आंतर्गं आता मला खुणावतंय
   ट ला फ फ ला ट करुन माझ्या षंढ व्यक्तिचित्रणाने ग्रह दृढ झाला, याचे आश्चर्य वाटले.
   परत परत मी काय लिहीणार हे मी सांगू शकत नाही.
   हुरूपाबद्दल आभार ….

   ऑगस्ट 30, 2012 येथे 2:18 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s