बोलतांना प फ ब भ!….२

वाटेवर काटे वेचित चाललो
वाटले जसा फुला फुलांत चाललो

अधाशासारखं हे गाणे ऐकत राहतोय. बाहेर झिरीमिरी पाऊस पडतोय. विलक्षण प्रकाश सर्वबाजूला ढगांच्या जाळीतून सूर्य फेकतोय. आज केव्हा नव्हे ते, निबंध लिहील्यासारखा पेन-कागद घेऊन बसलोय. पोस्ट ऑनलाईनच टाकण्यात आता जरा दम काढून बघतो. मला नववी-दहावीचे असे निबंध-वही-पेन घेऊन तास न् तास निबंध लिहीण्याचे दिवस आठवत आहेत. अलंकारिक आणि शास्त्रशुध्द शब्दांची सरमिसळ (!) करत राहण्यात मी तेव्हा किती मश्गुल असायचो. सुरवातीला बारीक छानसे मौक्तिक अक्षरं नंतर ती ओलांडून बेढब काहिसे मुक्त हिंदकळणारे रेखां भावनांच्या अन् कल्पनांच्या कल्लोळात उमटली जात असे. तेव्हाही आवाका लहान लहान म्हणून माझी शब्दांमार्फत इकडून तिकडून जाण्याची हिंमत कमी होती. पण, काही का असेना सर्वांच्या निबंधांच्या बटबटीत आणि गाईडछाप रेखांमध्ये माझे शब्द-निबंध कसे मस्तसे डोलायचे, हा कल्पभर्म(भम्र) मीच करायचो. अगदी परफेक्ट लिहीण्याच्या माझ्या नादामुळे मराठीच्या त्या मॅडमंना माझे शब्द-विस्तार हुर हुर करून पकडायला लागायचे. … हाही भम्र खरा होता का? कुणास ठाऊक.
या कागद-पेनांमुळे फारच वेगात शब्द-मुसंडी मारता येते, मात्र. वर्डप्रेसच्यात गुगलचे इं. ट्रान्सलिटरेशने मारी मुशाफिरीत जीव नकुशा होऊन जातो. अरे, हे झाले शब्दांच्या लिहण्याबद्दल; माझ्या शब्द बोलण्याबद्दल बोलायचे (लिहायचे) आहे मला……. image

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s