वैयर्थ जेथे उमगे सदा…

द्वेइत पसारा….

समहाऊ तीन पिंग्स आलेत. धुक्याच्या दिशेने वळवलेले पाय क्लिअरली गुंडाळले. तीन तीकोडी डोक्यात घुमू लागली, कोण कसा असेल..थंडी-भारल्या स्पर्शाने ऊब सुखु लागली. ऊफ, तोंडाची वाफ भारीच निघतेय..घेईल कोणी तिघांपैकी त्याच्या तोंडात, कि वास मारतेय हीपण वाफ; म्हणून झिडकारून देईल त्यातलाच कोणीएक….एएय जाऊ देना, आतांपैकी कोण तुला असा भेटलाय कि भेटण्याच्या आधी इतका दोघांच्या परस्परबाबतीत विचार करीन..काहीहीह्न.

हेय.डुक्कर. ठीक. तुकडा कामाचा.

हम्म, नन्तर भेटूच.

आजा; आजा ना …..हेहे दूर; नाही. कभी नहीं.. बोला बाय.

डोलणारे तिघे
माझ्या मनात बोलणारे
तिघे
सारखे
…तिडीक जाते पाच मिंताच्या अंतरावर सूर, जणू आर्तलेय दूर….दूर…
द्वेइत पसारा, द्वेइत पसारा, वारुनी दिधला अद्वैत सारा,

आर्तीच..नक्की

कोणाची.

वेगळाच कोणी अदृश्य आता ……………………………’आज’च्या पलीकडे

निघ आता ट्रान्स.
मोकळा वाहिला बोळा भर-पूर.

….एक होता त्यांपैकी एक, त्याने उसवली माझी खून-गाठ. मी मारली मग चपराक, त्याला वाटले तें; त्या आता मी धरून चार जणांच्या एका सेशनमध्ये.., सकाळी गायला तो मी उठताच एक ती गझल..

युं सजां चांद कें .

कोंकणी बोलायची भारी सवड,

ऐन गणपतीचे गजबजलेले दिवस, माझा रात्री दहा बारापर्यंत तेच बघण्याचा इवेन्ट घरी सांगून ठेवलेला; मग उशीर झाला म्हणून मित्रांकडे रात्र गुल असा कॉल घरी करून हा कार्यक्रम, तरी मी अथर्व शीर्ष पाच वेळा म्हणून न जेवता गेलेलो; त्याचा मी न येण्याबद्दलचा भारी हट्ट. दहाची नोट सरकवून माघारी जाच,     हो जातो.

फिरून मी धावत; शोधत त्याची गाडी, भिरकावलो त्याकडे..तो जणु परीक्षा घेतल्यासारखा लपलाय सिगरेटी लोकांच्या काळोखात..तो कधी घेतो, माहित नाही. आलाच सरळ समोर

काय झालं …

त्याची नकथ इच्छा असेल, मी ती बोलून दाखवली. हम्म कसाय-.री मान्य झाला …देव जाणो.

आणि निघालो सोबत.

पुढचा काळ…अश्रूंच्या अपरिमित ठोकारांनी धुमसलेला …………………………………तो मात्र मला अस्पर्शित……
थकलोय, जाणीव होत आली, नजर भिडली, मी उसासा सोडला…मग तो बाजूला सरला, ……………….त्याच्या हृदयगतात कुठलं खुट्ट झालं…..मला नाहीच कळलं
अजून हीहि नाही कळालेलं..
बाकी, शांत निजले, तो अशांत हॉल मध्ये सोफाला टेकून खाली बसलेला.. ती शांत खळबळ माझ्या दमणूक निजल्या शरीरात पोहचली. थेट काट्कोन रेखीव सांद्र केसाळलेला हात मी स्पर्श केला. ह्म्म्म, करंट.. तगमग कोणत्या विश्वापर्यंत पोहचली होती कुणास ठावूक.. झिडकारलं त्याने माझं बोट केसांत घुटमळणारं.
बस्स, नाही शांत न बोलूनही..
सकाळचे गोड स्वर .., माझ्याच कानात
न ऐकले
काही मी अजूनही…
अजून हीहि ..

Advertisements

3 responses

 1. .

  प्रसंग चितारण्याचं बळ दुरितांचे तिमिरनं दिलं.

  ऑगस्ट 29, 2012 येथे 4:13 pm

 2. पसारा आवडला तुमचा ,बुद्धीला धार असल्याशिवाय हा पसारा आवरता येणार नाही.बाकी काय उत्तम आहे नेहमी प्रमाणे

  ऑगस्ट 30, 2012 येथे 1:03 pm

  • .

   श्लेषी झालीय टीपण्णी!
   वेल, बाकीतला तोच तोच पणा सहन केल्याने धन्यवाद!

   ऑगस्ट 30, 2012 येथे 2:27 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s