वैयर्थ जेथे उमगे सदा…

बोलतांना प फ ब भ!…३

काल शहर बस वाहतूकीने चाललो होतो. खिडकीच्या जवळ नसल्याने मनात रुखरुख होती. साधारण कामकरी माझ्याहून एक-दीड वर्षं मोठा असलेला निर्विकार चेहरा मध्ये येत होता, म्हणून तो सारखा पाहिला जात होता, त्याचा खिडकीकडचा रसरशीत ऑफ-व्हाईट शर्टातला हात अगदी बाहेर सरकला होता. बाहेर बरीच मुस्लीम वस्ती लागली होती, त्याच वेळी शाळा सुटण्याने रस्त्यावर पोरं सुटली होती. जवळूनच बस जात असल्यामुळे घोळक्यातल्या लहानग्या समाजकंटकी मुलाने सावजासारखे रगरगीत हातावर आपले हात शेकले; याअर्थी कि मस्त मारले त्या बाहेर डोकावणार्‍या हाताला. त्या शाळकरी मुलाने शिक्षकांचा बराच राग बिचार्‍या बेसावधावर काढला. आणि, तो ध्यानीमनी नसतांना काय झाले म्हणून हैराण होत होता. हमखास, त्याच्या गावात काहीच कळले नाही! पण चुळबुळ करून त्याने मन शांत करून पाहिले. मी माझा बघ्याचा रोल मोडून प्रवेश केला, आणि बोललो..
“फाआ..तू.प ओ र..अस.”
त्याला अजून काही उमगले नाही..
मी माझा एकदा परत प्रयत्न केला.
“फाआ…प ओ र..अस..ता”
तरी तोच शांत बसला स्वतःहून ..जसा मी त्याच्याशी संबोधून काही बोललो नाही, ते तर नाहीच वर मी तिथे नव्हतोच; असे त्याचे भाव मी स्पष्ट पाहिले.
एक गोरा-गोमटा पोरगा बाजूला बसलाय, सारखंच वय असणारा, फरक फक्त सुखवस्तू दिसतो एवढा.
मलाच माझे असे अस्पष्टसे उच्चार ऐकायला आले नाही, तर त्याला माझ्यामुळे दोन-दोन शॉकमध्ये तंतरावं लागलं असेल….

हा एक प्रसंग.
अजून आहेत. येतील. वाचता येतील, पण बोलले जाणार नाही; माझ्याकडून. माझं बोलणं आहेच तसं.
वरच्या संभाषणात मला म्हणायचे होते,
“फालतू पोर असतात.” पण माझ्या बोलण्याचे अवयव कमकुवत का काय आहे;
काय माहित, पण होते ते असेच.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s