वैयर्थ जेथे उमगे सदा…

इकॉनॉमिस्ट पार्ट,३

p2lKc9-fQ

p2lKc9-gz

कुठला प्रकार मंदीचा तर कुठचा सद्दीचा तो कळायला आजचा भाग. सद्दीला तर काही भाव नसतो, जर आलबेल असेल तर तिला ढुंकूनही बघितले जात नाही. तरीही, पाश्चात्यी नाकं कुठलाही प्रकार ‘प्रकार’ करायला सरसावली जातात. मंदीच्या पुढल्या हाका मात्र समजल्या जातात. परिणाम एकच असला तरी, कारणे अनेक असतात.

उदा. आतापर्यंत माहित पडलेल्या तीन मंदीचे तीन निर-निराळी कारणे अशी घडली,

_ पहिले महायुद्धाधी जाणवली मंदी; कारण औद्योगिक क्रांतीचे दुध उतू लागले होते, मागणीची गरज म्हणण्यापेक्षा त्याची चणचणच जास्त भासू लागली. भासणे..महत्त्वाचे; भासच लागतो मंदी खरी उभारायला. तर त्याकरता सत्ता-ओढीच्या कारणातून मंदीचे निराकरण करावे लागले.

_ दुसरे महायुद्धाधी सेम झालेले. अमेरिका केंद्रित इकॉनॉमी बनायला इथेच सुरुवात झाली., पण इथे चाकं वेगवान होती, मागणीऐवजी पुरवठा इथे मार खात होता. पुरवठ्याचे साठे शोधणे हा एकमेव बिंदू मंदी साठवायला पुरा होता.

_ आता भली मोठी मंदी, जी निरंतर टिकेल अशी आशा (निराशा) केली जाते. ती सुरु झाली तो काळ, सत्तर-ऐंशीच्या दशकापासून तर आताच्या काळात तिच्या चाकांना बेडकांसारखे पेव फुटले आहे, युएसच्या रस्त्यावर तशी बेडके दिसतात, आणि युरोपातल्या पोर्तुगाल स्पेन इटलीला त्या बेडकांची अंडी उबतात.

ह्या ढोबळ कारणं-वर्णनातनं मंदीची विस्तृत दाहकता जाणवणार नाही, पण ते जसे माझ्याकडून मांडले गेले तसेच आताच्या  मंदीचे सामोपचार समग्र पुजावरताण आपल्याकडून झाले आहे.

आताच्या मंदीचे सामोपचार समग्र पुजावरताण-

फारच किरकोळ समजून लाच देणे, हे बँकांपासून सुरु झाले. अर्थात, भारतात नाही तर, पाश्चात्य बँकविश्वात. बँकेचा वावर हर-क्षेत्रात रुजायला लागला तर हे पाश्चात्य बाळकडू भारतीय बँकांत रुजलेच. जे रुजले, ते रोपटे होते, वृक्ष तर होतेच जर रोपट्याला खतपाणी घातले, तर. हर-क्षेत्रीय असल्याने बँकांचा लाच व्यवहार हर क्षेत्रात घुमू लागला. हे मी इतके सहज म्हणतोय, तसेच हे कुणाला न समजता सहज घडले. बरे, बँक बरबटलेली तर बँकेवर असलेला आर्थिक जगताचा विश्वासही बरबटलेला, पुढे आर्थिक जगताने चालणारी राष्ट्रेही बरबटलेली; बरबटलेल्या राष्ट्रांकडून उर्जा-स्रोतांसाठी होत असलेला बरबटलेला धुमाकूळ जगात जरासा शमला आहे, कारण हे बरबटीकरण मुळापासून धसले आहे. बरबट असो वा खरी-खुरी प्रगत-बरकत असो, शेवटी ती पैसा मिळविण्याची साधनं; त्या साधनमिश्रीत उर्जास्रोताला नंतर मर्यादा येते आणि सारे कोलमडून पडते.. जसे अथेन्स पडले, मौर्य-गुप्त सुवर्ण काळ पडला. अगदी आपली अशी नाज़ूकि आलीय कि कारण दोन्हीही बिंदूं; बरकत नि बरबट चे एकत्र येऊन कोलमडणे होत आहे. म्हणून मी तिसरी मंदी निरंतर (निर्)आशा म्हणतोय….

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s