वैयर्थ जेथे उमगे सदा…

घाबरतो कुणाला..

आतापर्यंत मला कळालेय, कि माझा ब्लॉग कुणी वाचत नाही. मग प्रक्षोभक लिहीले तरी, त्यासाठी मला अटक होणार नाही. व्यंगचित्रातूनच प्रक्षोभक घडू लागते, हा भ्रम सोडून द्या. गुंड प्रवृत्तीने ग्रासले जातांना कोणत्या पडत्या फळाच्या अपेक्षेने आपण नारायणावताराची अथवा शिवबांच्या ग्रहणांची वाट बघत आहोत. निष्क्रिय तोंडावळे गांधी-नेहरूंनी बसवल्यावर ब्रिटीशांच्या पारतंत्र्याचा सेकंड एरा का आपण सुरू करत आहोत. सावरकर पाहत होते फक्त; नंतरून त्यांचे आपल्याला धडे होते की, त्यावेळी तसे नसायला-असे असायला हवे होते. जर त्यांचे अज्ञातांतील स्वातंत्र्याकरिता अग्निहुती होत्या, तर त्या पेरलेल्या बीजांचे पुर्णत्व कुठे आकाशात विलीन झाले का?
आता ना सावरकर, ना गांधी-नेहरू. आत्ताचा ढळढळीत नेतृत्व-प्राणी कोणता? कुठे गेला? कि रानातल्या क्रांतिसैनिकांचे धगधगते नेतृत्व स्विकारायचे.
ठीक होते, जे सारासाराला धरून संवेदने लोकशाही (भारतातली) गांडू बगीचा असली शिवी हासडली, ते. तेव्हा स्थिती बरीच बरी होती; हाता-अंगाबाहेर नव्हती. आत्तातर दळणारं दळण लोकांच्या अंगी पचवण्यात लोकशाही सहर्ष रमली आहे. उद्वेग प्रत्येकाच्या मनात तयार करते आहे. भरीस भर गुंडांच्या माथ्यावर पूर्णचंद्र उगवला आहे. वार्तांकनाच्या भाषेत सांगायचे तर, जातीय फूट-धार्मिक फूट सर्रास होत आहे. लोकशाहीने भरलेली मनं माणुसकी म्हणवून सरकारी तिजोरीत का पडली आहेत. तेच, सरकारची खजिनदारी इतकी अप्रुपाची का. कारण सरकारच्या खर्चांवर जाब विचारता येत नाही, आणि ही तिजोरी भरते ती आपल्या सर्वांच्या इवल्याशा तिजोरींवर डोळा ठेवून. चाणक्यही टॅक्सच्या पाठी होता, निर्भेळ प्रामाणिक करवसुलीने लोकशाही काय राजेशाहीसुद्धा टिकू शकते हे त्याने सर्व जगाला दाखवून दिले. महाराष्ट्रात तर प्रामाणिक करवसुली करणार्‍या सरकारी अधिकारीला जिवंत जाळले जाते मग, इतर राज्यांत आणखी काही वेगळे होत नसेल. केवळ अण्णा का लोकपालसाठी लढत आहेत, याखेरीज आपण प्रत्येकाने प्रत्यक्ष सरकारविरुद्ध बंड उभारावे; तरच लोकशाही खरी असल्याचे ठसले जाईल.
आज काय तर म्हणे भारत बंद, असल्या वांझोट्या विरोधांपेक्षा आपल्या काही वैचारिक हालचालीं तरी दिलासा देतात.

Advertisements

3 responses

 1. आपल्या मताशी मी पूर्णत: आहे . चालेले तरी काय आहे कळत नाहीये,दिशाभूल होतेय लोकांची वेळीच जागे व्हायला पाहिजे .कोनामधेच ताळमेळ नाहीये , सरकार ना विरोधी पक्ष ना अण्णा तें ना बाबा. सामान्य जनतेची जी फरफट चालू आहे ती चालूच आहे , विकासाच्या नवा खाली जो तो आपले खिसे भरतोय ,पक्षाच्या निधी मध्ये भरगोस वाढ झालीय , मिडिया ला पण राजकारणाने वेढलेय , दंगली जातीचे राजकारण यात यांचे पेव फुटलेय ,
  सत्तेसाठी काहीही करण्यास तयार झालेय लोक। हि कसली मानसिकता , असल्या गोष्टीनी काही ही सध्या होणार
  नाहीये,हि तर आपल्यातील माणसे मग असे का होतेय आपणच निवडून दिलेली , तिथे गेल्यावर त्यांच्यात बदल होतो ,सर्व जन सम पातळीत येतात आणि त्यांना हवा तसा विकास करतात [नेमका विकास कोणाचा होतो, ते सांगायला नको] ,कोणी काय विकास केला ? यावर भांडणे चालतात ,पण खरोखर जिथे विकास झालाय तिथे खरोखर तुम्ही त्याची प्रशंसा करा पण असे होताना कमीच दिसतेय जो तो एकमेकांचे पाय ओढतोय….अविश्वास
  फेसबुक वर तर प्रत्येकजण चांगले विचार लेख शेअर करतोय , इझिली हे सर्व होतेय पण आपण खरोखर अस वागतोय का ? असला विचार आचरण कोणी करताय का ? सर्व चांगले वाटतेय इंडिया शायनिंग वैगेरे त्याची दुसरी
  बाजू फार दाहक भयानक आहे ,

  सप्टेंबर 20, 2012 येथे 8:29 pm

  • .

   आपल्या मतप्रदर्शनाकरिता धन्यवाद.

   सप्टेंबर 20, 2012 येथे 9:33 pm

 2. आपल्या मताशी मी पूर्णत: सहमत आहे

  सप्टेंबर 20, 2012 येथे 9:00 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s