इकॉनॉमिस्ट पार्ट,४

p2lKc9-fQ

p2lKc9-gz

p2lKc9-i2

रक्त आटवून पैसे-रूपये कमवायचे, ते लाच द्यायला कमतरता राहायला नको म्हणून का?
सो कुलमध्ये काल टीपेचा सूर किती कर्कश्श झाला आहे, ते वाचले. टीप देणे म्हणजे चक्क लाच देणेच, गोड हसत नि गळे काढत. कमालीची सैल हलाखी टीप देण्यातून पसरते. बरे, या लाचेच्या पिल्लूला सोडून लाचेलाचं खरडायला घेतो. लाच-ब्राईब हे काळाबाजार-ब्लॅकमार्केटमधले एकक-युनिट वाटाघाटी-ट्रान्झॅक्शन आहे. काळा पैसा उभा करण्यापासून ते तो सांभळण्यात आणि नष्ट करण्यापर्यंत लाच मदतीला येते. सर्वच्या सर्व जे सद्यस्थितीचे दर्शनी सुखी आनंदी लकाकीचे जगभरातील जगणे आहे, त्यात लाच अदृश्यतेने महत्त्वपूर्ण घटक म्हणून जगत असते. मी हे सर्व लिहू शकतो, ते लाचेच्या कृपेने.., नुसते लिहून नाही; ते तुमच्यापर्यंत पोहचवण्यातसुद्धा लाच मला हात देते. हे म्हणणे अगदी देव त्राही त्राही या जगात विखुरला-विसावला आहे, त्या तोडीचेच..खचितच लाचेने सर्वदूर पसरून, सर्वस्पर्शी राहून कल्पनेच्या देवाला खरे-खुरे उतरवले. लाचेला ना भौगोलिक सीमा अडवतात ना चलनांच्या परिसीमा. पूर्वी प्रदेश-प्रांत व जमिनींचा नवीन भूभाग अश्या जीवन संप्रेरक गोष्टींनी शूर-वीर तसेच बुद्धिवान, जीवन रसरशीत जगण्याची आस असलेल्यांची आयुष्यं सरत असत; इनफ निवळून जात असत. ड़ायनासॉर एकाएकी गडप झालेत, तश्याच औद्योगिक गडबडीने का कश्या भयकारी भूकंपाने तसली विचारसरणी गडप झाली. खुबीने इंग्लिश अराजकीय रक्तात भिनलेले लाच हे बरबटलेले थेंब त्यांच्या राजकीय इर्षेच्या इंजेक्शनाने जगातल्या सर्व माणसांच्या अंगात भिनले. आणि तेव्हापासून कोणतीही विचारसरणी म्युट झाली. जर तिला खडखडीत तोंड फुटले, तर ती हुकुमशाही म्हणून निपटली जाऊ लागली. मग मी प्रश्न विचारला…
रक्त आटवून पैसे-रूपये कमवायचे, ते लाच द्यायला कमतरता राहायला नको म्हणून का?

Advertisements

8 thoughts on “इकॉनॉमिस्ट पार्ट,४”

 1. छान. या सेरीज चा अंदाज, मजा यायला मला जरा वेळ लागला. थोडा वेळ घेतलास तरी काही हरकत नाही. पण अर्ध्यातून सोडून देऊ नकोस. त्याच बरोबर प्रयोगशीलता(पर्याय नाही अश्या समिक्षिकी शब्दांना)जपताना स्टंटबाजी नको. असंदिग्धता नावातच असूनही जबराट सोपं,कधी प्रयोगशील, कधी विश्लेषकी पण कष्टपूर्वक समंजस लिहिलेले ब्लॉग्स तू वाचलेले असशीलच. “ब्लॉगिंग ही अमुक अमुक गोष्ट आहे आणि,परंतु , तरीही…”, नुसता काथ्याकुट. लेखन कुठल्याही कलाप्रकाराप्रमाणे विकसनाची प्रक्रिया आहे, तिथे सुरुवातीला तंत्रावरची बेसिक मास्टरी लागतेच. टायपिंग पासून html चे बेसिक ज्ञान हे सर्व यात येऊ शकते. मराठी जलद टंकता यावे यासाठी धीर धरून प्रयत्न करायला हवेत.वैतागून कसं चालेल. कुठलीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी पुन्हा संदर्भ तपासून पाहायला हवेत. उतावीळ होण्यातच जर आनंद मिळत असेल तर मग संवाद संपलाच.
  दुसरी गोष्ट म्हणजे, तुझ्या काही पोस्ट्स मला लयी आवडलेल्या आहेत. खबरबात, खोटं~, शीर्षक नसलेली पोस्ट,स्वपिडू जंतू , तर्तरणारे जीव उल्लेखनीय. असं परत लिहू म्हणता लिहिता येत नाही. त्या unique भावावस्था, वयानुरूप असलेली उत्कटता यातून आलेल्या असतात, कुठलीही पोज न घेता प्रामाणिक.
  वाक्यागणिक तीन dots टाकले की संवेदनशील लिहिता येतं हा गैरसमज नाही हे विशेष.

  1. भयंकर भावनिक लिहीलंय या कमर्शिलाईज्ड पोस्टवर उत्तर देतांना. ही दखल घेण्याची मनस्वी वृत्ती पाहून मी थबकलोय. इतकं कळतेचं मी आणखी हरखत जातोय, इनजनरल ब्लॉगटच राबवणारा मी ब्लॉगच्या कक्षा मांडू-ओलांडू शकेल कधी; तरी मग ब्लॉगच्या कक्षां-परिघाचा इतका समरशीत अभ्यास असलेले आपण रसरसणारे चित्र पार माझ्या मनात भरवले, हे सारे कसे लिहून. अनोखी तगमग लागलीयं आता आपल्या प्रतिक्रियांसाठी.
   पार कला निकडीची होईस्तोवर पण निर्जीव लकेर काढेस्तोवर प्रवास या दुनियेत तर हमखास करता येतो, आपल्या स्टेटमेंटसारखं मी वाचलं समंजस. कधी कंटाळा करता आला तर कधी धकधक वाढवता आली. कलेच्या निष्णात प्रांतासभोवती घिरट्या घालणे मी सोडले नाही, म्हणून तर ब्लॉगचं कोलित हाती आलं. आणि असंदिग्धपणे संदिग्ध गोठवायचा प्रयत्न करत राहिलोय.
   विकासाची चर्या आणि त्याचा वेग तो कुठेतरी नष्ट व्हायला धडपडत असतो. लेखन माझे अगदी पहिले घरी मी कसे अभ्यास करत असल्याचे नाटक करतो ते मधे पुस्तक नावडीच्या कारणांवर डोकेफोडी ते माझे वैयक्तिक लैंगिक रोखीचे नसरळ लिहीणे, ते मनातून खुले करण्याच्या तडफडीत संदिग्ध बोलणे ते अकॅडेमीकली माझे जगात असणे लपून लपून दाखवले जाणे, झाले काही काही; हे निव्वळ फालतू करवून मी शांत राहेन पुढच्या एप्रिलपासून….का तर उगम संक्रमण विलय दुरित जाणतो, त्याला ते हवेय, चारीदिशा ही तर रित कलेपकडून आहे, रितीचा अभिमान आहे म्हणून ती हवीय. मिरॅकलटाइप मी परत माझंच टुमणं वाजवलं इथे उत्तर देतांना …आपले लिहीणे सर्वसमावेशक स्वत:चे सोडून. आपले मार्ग निकाढून इतर सारे मार्ग निखालस सरळ दिसतात आपल्याला ..अविश्वास दाटतो जर मी दुसरे मींबद्दल बोलल्यावर ..का कधी असे पण?
   सारखे कौतुक धन्यवादऐवजी आपले पोस्टचे लयीचं कौतुकाने ..

   मराठी इतकी जवळ आहे ना कि, त्याकरता दिव्य काहीच वाटत नाही.
   आपला कुठलाच ब्लॉग नाही…गळा दाटतोय माझा. भली थोरली कमेंटला कमेंट वाचून आपला घसा दुखू नये, मात्र..

 2. मी उलटं जातो हं. तुझी भली थोरली कमेंट वाचून माझा घसा दुखला नाही बरं. माझा ब्लॉग मी एकदा उडवला म्हणून माझ्या अंतरंग मित्राने, माझ्या दादाने माझा गळा दाबायचा बाकी ठेवला होता. मुळात त्यावर फारसं काही नव्हतंच. शिवाय माझ्या इतर लिखाणाचे वाचनाधिकार मी त्यालाच देऊन टाकल्याने (एकुलता एक तोच वाचक म्हणून :-)) इतर कुणाच्याही गळ्याशी पाणी आलं नाही हा फायदा. माझा ब्लॉग नाही म्हणून तुझा गळा दाटून येतोय हे ऐकून खरं सांगावं तर मला गुदगुल्याच झाल्या! परंतु मुद्दलातच मी फार कमी; म्हणजे काही लिहितीच नाही. जाऊ दे, ह्यावर ऐस पैस गप्पा निवांत. आणि हे काय बरं, पुढच्या एप्रिल पर्यंतचे? जर लिहणं असं एकातून एक अनंत सूत्रं निघावीत चोहोबाजुना, प्रासंगिक, प्रांजळ, क्लिष्ट, स्वैर दिशाहीन तर ही कालमर्यादा कुठं बसवायची या pattern मध्ये हा प्रश्न मला पडला आहे. आखून घेतलेल्या रिंगणात आडव्या तिडव्या उड्या मारायच्या आणि आणि प्रत्येक उडी स्वतंत्र, उस्फुर्त आणि वेगळी आहे,( आणि उड्या मारताना आभाळाशिवाय बात करायची नाही) असं मानून चालण्यात त्याच ‘मी’ वर अविश्वास दाखवल्यापरीस. या कृतींना स्थिती-लयाची पुस्ती जोडण्याची गरज राहत नाही. ज्या मी वर विश्वास आहे असं वाटतंय, त्याच मी ला या निरर्थ बंधनांची जाण झाल्यावर अशी अजून कारणं गळून पडतील आणि तू मोकळा व्हावास. विकासाच्या चर्येला इतक्या ठामपणे लयाकडे नेण्याचा हा हट्ट तर नव्हे? असेल तर या संक्रमणाला फारसं महत्व नाही. रिंगण आखून घेणाऱ्या उत्पत्तीला मग काय म्हणायचं? संक्रमणात येणाऱ्या शक्यतांचे काय? असो. इतकी ठाम वृत्ती झाली असेल तर चर्येला वेगळे चेहरे मिळोत, कंटाळ्याना आणि स्पंदनांना नवीन आकार मिळोत,ही माझी साधी शुभेच्छा. लय म्हणजे अस्तित्वहीन होणे नव्हे, कुठल्यातरी अजून मोठ्या परिमाणात मिसळून जाणे एवढे लक्षात असू दे. इथे मात्र अगदी रुक्ष झालास तरी जी. एंच्या शब्दात तुझी वाढच झाली म्हणायचे. हा झाला माझा विश्वास. जे लिहिले आहेस ते निव्वळ फालतू केलेले असशील तर जे लिहिले आहे ते माझ्या हार्ड डिस्क वर साठवण्याची मुभा द्यावी, हे मागणे आत्ताच तुझ्यापास.

  1. प्रथम धन्यवाद आणखी एका कमेंटबद्दल.
   नंतर हे कि, गप्पा मारायला आपल्या ब्लॉगचे असणे गरजेचेचं. ब्लॉग बघितला तरी ऐस पैस निवांत गप्पाहून अधिक शेअरिंग होईल, प्रामाणिक मत आहे. आनंद येण्यासाठी नेहमी गुदगुदल्यांची गरज नसते.
   पुढे आपण तर जगनियंत्याचे वर्णन करतायेत असं वाटलं. तो सर्वसमावेशक मी कुठे तरी नक्कीच रिंगण गिरवत आहे जरी त्याचे अथांग अपरिमित प्रयत्नांनी रिंगणात ताणण्याचे, उड्या उंचंच उंच खोल खोल घेऊन मुक्त होण्याचे कष्ट चालू आहे. तो करतो भन्नाट मनाचे खेळ आणि त्याचे त्याअधिक भन्नाट खेळ मोडायला मनमुटाव. या रूक्ष रचनाकाराची मी एक रचना. कसला हट्ट न पुरवायचा त्याचा हट्ट, तसा माझाही. संक्रमण विकास याचा विलयासाठी वापर होतोय तर लयाचं परिमाण बदलत असून विकास कधी लय गणला जातोय. आपलं म्हणणं रास्त बरोबर आहे कि, मी कुठे तरी दुसरं दुकान थाटू शकेल. परंतु लय कधी विकासात मदत करत नाही, तडकाफडकी तो हजेरी लाऊन जातो.. बस हे सहन करण्याइतके नसते, म्हणून तो वाईटच ठरतो. असो ही चर्चा करायला दुरित लायकीचा नाही, कारण वाईट ठरणार आहे तो. आपले काही क्षण माझ्या अक्षरांनी निवर्तले गेलेत, देवाचे अस्तित्वा चे त्रिकोण चौकोन सळसळले गेलेत य़ात आनंद.
   जी एं चा संदर्भ कळला नाही..
   सर्वांसाठी मुभा आहे…
   आपले शतश: अभिवादन..

 3. घरी येताना चालता चालता मला माझ्यातील या विरोधाभासाची जाणीव झाली. मी अगदी रावापरि ऐटीत चार वाक्यं बिचाऱ्या तुला ऐकवून आलो.आणि माझ्या स्वत:च्या असल्या उद्योगांना काय बरं स्पष्टीकरण द्यावं हेच कळेनासं झालं.अगदी उपदेशाची भाषा करायला ना अनुभवाचा,ना वयाचा,ना बौद्धिक आधार. मला sheepish वाटू लागले आहे.

  1. जिथे माझ्या उद्योगांना मी स्पष्टीकरण देऊ देत नाही तर आपणही तशी चिंता का करता. उपदेश यथार्थ वाटला बराच, का बरं आपल्या अभ्यासू विचारांना वय अनुभव आणखी काय कायच्यात कोंडून घेत आहात.बिचारे माझे वाचकवर्ग मला न छळता विरोधाभास करत आहेत. मी मात्र अजून अजून कठीण घाट वाचायला देत असतो, पर्वा मला लागते कि खुळ्याचे खरेपण यांच्या समोर आले तर किती उंचावरून कडेलोट खुळ्या दरीत करावे लागेल याची.
   घरी जातांनाही चालता चालता आठवलेला एकटा दुर्मिळ जगात नसेल कुणी, आपले प्रेम कुणाकुणाला सारखे मिळत राहो ..सदिच्छा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s