वैयर्थ जेथे उमगे सदा…

निराशेचा पुरिया सूर

दोन दिवस शांत कसं पडून आहे. येणारे जाणारे सर्व विचार थबकून मला पाहत पुढे जात आहे. काही करायचे नाही असे मला या दोन दिवसांत. म्हणून, मग ब्लॉग वाचण्याचा फडशा साधून घेत आहे. ब्लॉग वाचण्यात काहीच अर्थ काहीच नसतो, निर्वात पोकळीसारखा, सापडत नसतो काहीच; मी तरी तितकंच सजग वाचत जातो.

गणराज एकूण विसावले, हे भारी झाले. काल मित्राने गणपती स्पेशल पोस्ट वाचली. लग्गेच, समस करून म्हणाला, कि आपली लेटेस्ट पोस्ट वाचली. नकारात्मक सूर आहे पोस्टचा. उह्ह, नकारहर्ता काय म्हटलं गणेशा तुला, लोकांना नकाराचा सेन्स लग्गेच चढला. पण देवा विघ्नहरा, तुझ्या नावाने सर्वे अरिष्टे दूर होतात; तो तुझा मोठेपणा नाही रिचवता येत त्यांना. (बाबा [हा माझा मित्र], सॉरी रे तुला न विचारता तुझे शब्द तसेच्या तसे वापरले. दोष माझा आहे, लिहिले तर मी तसेच होते; पण बापुडा गणेश काय डोकं खाजवत असेल कि

एक. सरळ जाणारी लोकं मी निर्माण केली खरी तरी पुढे तीच मला वाकड्यात काढणांरे म्हणून.
दोन. पृथ्वीतलाच्या जीवांना घोर नकारासुराचा बोभाटा पसरवणारा जन्माला आलाय म्हणून.
तीन. माझी बुद्धी भ्रमिष्ट होईल इतपत त्या नकारासुराच्या वंशजाचे लिहिणे असते म्हणून.

असो, एकुलता एक सजग वाचणारा आहेस रे तू बाबा, नाराज होऊ नकोस. तो गणराज निस्तरणारच शेवटी, खात्मा करून नकारासुराच्या वंशाचा; तोवर झेल रे..)

बावचळ वाक्ये टाकलीत कि, उगीच मीही थबकतो..

कधीकाळी याच गणरायाच्या निवासात माझी हुरहूरणारी पावलं आणि त्याची दिलदार नजर एकत्र झाली होती. फुकटंच मी सोनू, निगम, उदित, नारायणची गाणी मनात लावली होती. दीड दमकीची हवा अंगात सामावून घेत आठशे फुटांवर तरंगत होतो. तो गणराय ते सारे बघून हसत होता फिदीफिदी, स्पष्ट पाहिलं मी तसं. त्याला दया येणारपण होती नंतर, पण तरी भावनांचा कल्लोळ त्यालाही कधी प्रिय. सारी बनावाची नाटकं तोच चितारतो. अस्फुटक!!

इतकासा शिंपला मी
हिरीरीने सोडला समुद्रात..
तोड जपला मी
त्याचा सहा वर्ष खिश्यात!
नवीन जागी मी उदासवाणा तिरका
दाराला जोडून तो चमचमला फर्ष्यात..

मारव्याचा सांज-तुटका सूर बदलून आता पुरीयात प्रवेश मांडतो.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s