! –१ (मेलोड्रामा कम रिआलिटी)

एकचित्त सांगतो, माझ्या जीवनात आलेल्या तीन मित्रांच्या रहदारीत झाले त्या कातरक्षणांना चित्त विखरून इथे ठेवायचे आहे. माझे जीवन या भंकस प्रकाराला खोलातली खोल गर्तेची आशा न लागते तर नवल होते, ते तिघांच्या जाणीवपूर्वक सुखाच्या लिंपण्यामुळे रमता येतं जरासं त्यातल्या त्यात. एकाचा तर इतका यासाठी गेम वाजवला जातो कि , भामटेपणाने त्याच्या सुखाच्या चादरीवर मी लोळून पडतो. वैयक्तीक नावाखाली आचरट चाळे करून घेतो. महान बनविण्याचे यंत्राहून मंत्रही देतो, हे बाकी मला वाटते. त्याची प्रतिक्रिया गोड घश्याखाली कडू गळा अशी येते. अनेकदा मानसिक करंट्स बसतात त्याला, तो गळचेपी बोटचेपीप्रमाणे स्विकारतो. मग मलाच राहवत नाही, म्हणून सर्कसीच्या नोकराला ओरडतात तसे त्याला ऐकवत(!) राहतो. सुरीवर बासुरी असा मृगनयनी प्रकार त्याच्यावर करतच असतो. त्याने वाचले आहे कि नाही माहीत नाही; नाही तर हिटलरच्या छळछावणीतले अत्याचार माझ्याच वर्तणुकीवर इमॅजिन करून त्याने हिटलरचा पुनर्जन्म असे मानचिन्ह हसत हसत(!) दिले असते. दरवेळी माझी लांडी लबाडी त्याच्याभोवती भ्रमरासारखी फिरत असते. फिलॉसॉफीकल प्रसंगांना मी प्रयोग म्हणूनचंच त्याला वापरतो. अश्या गांधींच्या पुनर्जन्माला महान पध्दतीने मी छळत असतो. ह्या प्रिय मित्राच्या प्रकरणाला निरंतर धार असणार आहे, माझं जीवन संपुष्टापर्यंत.. त्याच्या मृदू नि माझ्या कठोरपेक्षा निष्ठूर समतोलाने … मनाच्या कोपर्‍यात रक्ताने भिजलेल्या बासरीने..

Advertisements

7 thoughts on “! –१ (मेलोड्रामा कम रिआलिटी)”

 1. ह्या अखंड भूतलावर ही पोस्ट कुणीही वाचली नसली तरी ती पहिल्यांदा वाचण्याचा मान पुन्हा माझ्याच नशिबी जातो हे किती नवल नाही का? तू जसा रात्री बराचवेळ जागून का काथ्याकुट केलास तसं मी सुद्धा असंच काहीसं होण्याच्या अपेक्षेने मोबाईल वर बाऽऽऽरीक लक्ष ठेऊन होतो. बरोबर सकाळच्या २:४५ ला “टिंग” असं वाजल्यानंतर ती ह्या तिमिरात लिहिणाऱ्या दुरिता कडूनच असेल अशी पक्की खात्रीच होती. तिघा मित्रांच्या रहदारीत ज्या मित्राचा गेम वाजवलास त्याला राग मात्र आला नसेल (नक्कीच!) पण दुरीताची ‘priority’ मात्र नक्की कळली असेल. खरंतर फोनवरच्या ‘दुसऱ्या’ मित्राचे मला जाम कौतुक नि अभिनंदन करावेसे वाटते. ‘गेम वाजलेल्या’ मित्राच्या तुलनेत तोच ‘ग्रेट’ ठरला. माझा सुद्धा पूर्वी बऱ्याच वेळा असा ‘गेम वाजलेला’ आहे त्यामुळे हे काही नवीन नाही. असो…

  1. गर्र्र! अचकट विचकट शब्दांमध्ये ब्लॉग राहण्याने दुरितचे मन कळत नाही, ही नम्र लालसा बाळगत जाणार्‍या दुरितची तुझ्यामुळे लाल संपते आहे. असंही पृथ्वीतलाचे नियम न मोडता राहता येते मला, मग त्या भौतिक कचकड्यांतून माझी भावना पकडण्याचा एकमेव मार्ग आहे. बाकी, मित्र म्हणशील तर ते तुझ्यामुळे आठवून लिहीले. तुझं बिनसलेलं गात्रं अंगात घुसलंय, त्याची हातापायातून निसटून टाकण्याची निव़्वळ धडपड. prirority म्हणजे?, तो भाग नाही कळला. राग येतो आणि राग कितपत येऊ शकतो, याची जाणीव तुला नाहीये; तरी राग धुमसत ठेवणे जमते तुला. वरवर खुपतेय..असं तर मी म्हणू शकतो नं..

 2. कोणी वाचत नाही म्हणून लिहायचे थांबवत नाहीस हे ग्रेटच. मी बऱ्याच पोस्ट्स वाचल्या आहेत. त्यातल्या बऱ्याच वैयक्तिक संदर्भांनी भरलेल्या असल्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे आवडले नाही. ते मरू दे. मेंदूचा फोटो मारायचा इतका आग्रह लिखाणात का हे विचारावेसे वाटते.

  1. तंतोतंत.
   कोणाचे जाऊ द्या.
   दुरित नाव धरलं यासाठीच. पण, प्रयत्न फोल. वैयक्तिक संदर्भ खोडून टाकण्याचा मी स्पायडरमॅन इतका आटापिटा करतो. हजारो प्रवाह एकाच दिशेने जाऊन गडप होतात, तसंच हजारो विषय-विचार-संकल्पनांच्या एक न् एक जादू-हरकती या मेंदूत बंद होतात अन् माझी माझीच बडबड करावी लागते. बोलणे होतेच जर व्हायचे असेल तर हे मी आल्हादलाही म्हटलं.
   आपले खास धन्यवाद पोस्टस् जवळपास सर्व वाचल्याबद्दल, MIB या इतक्या आधीच्या पोस्टवर असलेली आपली कमेंट नेहमी आठवते मला. वैयक्तिक लेव्हल शुन्याखाली आणण्यासाठी लिहीतोच जरा मेंदूलाच बंद करून बाहेरचे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s