वैयर्थ जेथे उमगे सदा…

देवदत्त

शहरं तिथेच आहेत पण आपल्यातील अंतरं वाढली आहेत. का कसे पार चेंदून मेंदून ठेवलेत मी कधी. कॉन्सियस राहण्याचा कळस गाठून अनुभवी नोंदवलेलं नालायकपण. गतकाळ गतीने गतीचं नासवलेलं मी रिक्तपण. हताश अबोल पाण्याचा छद्मी तळतळाट हबका कुणी स्विकारला आपणहून, प्रश्न पडलेत आत जीवाच्या जवळ. विनोदाची प्रसन्न सीमा कसकशी मांडून हसवण्याचा प्रयत्न कुणी केला. कसलेसे उदमांजराचे कवच लाऊन लटपटत राहत होतो कुणापासून. प्रहरी रक्ताची निर्वंश देवाण घेवाण .. नसलेली लाट ओसरण्याचा केवळ खेळ लावत बसायचं डोळ्यांवर..निजेस्तोवर. तो कसमटत राहणारा निर्मम प्राण; मी दंश पिणारा तुला क्षणी नकोसा नाग. गोडएस तू बोलणं खुंटलं मला तुझं त्या प्रहर कड्यानंतर.. अजून बरंच मी बोललं नाही ते, तुला ऐकायचं ते खाजगीत.

Advertisements

One response

  1. सत्य पूर्णपणे स्विकारण्या आधी ते गळ्याखाली उतरवून त्याला रिजवणे खरंच किती अवघड आहे. केव्हाचा माझा प्रयत्न चालू आहे. एका व्यक्तीचं ‘मन’ आणि ‘शरीर’ असे दोन वेगवेगळे भाग पाडून त्याचे वेगवेगळे अस्तित्व मान्य करणे खरंच महत्कृत्य आहे. माझं मन मुळी ते स्वीकारायलाच तयार नाहीये. माणूसपणातून देवत्वाकडे प्रवास त्यासाठी मला करावा लागणार आहे. सगळंच नव्याने. शरीरातून मन वेगळं करून त्यांवर प्रेम करावं लागणार आहे. कारण ते ‘बाह्यांगी शरीर’ आधीच कुणाचेतरी होऊन बसलं आहे. ह्या एका विचाराचे चटके प्रत्येक क्षणी मला सहन करावे लागणार आहेत – ज्या ज्या क्षणी मी त्या मनावर प्रेम करणार आहे, त्या त्या क्षणी. त्या प्रत्येक अवघड प्रसंगी. आणि त्या प्रेमाखातरच तू न बोललेलं मी ऐकेन, जरूर ऐकेन. तितकी ताकद नक्कीच माझ्यात आहे. नशीबही कुणाचे? आमचेच! काही मिळवण्या आधीच ते गमावल्याचा आनंद नेहमीच आमच्या नशिबी. त्याला तू नि मी काय करणार? त्या कस्पटासमान बाह्यांगाला काहीही महत्व माझ्यानिशी नसलं तरीही आंतरिक प्रेमाचा मेरुमणी गाठताना त्याचीच साथ लागतेच, तो स्पर्श लागतोच. कितीही झालं तरी दोन मनं एकमेकांना भौतिक स्पर्श कधीच करू शकत नाहीत, हे कटूसत्य मला स्वीकारायलाच हवं.
    -मयूर.

    ऑक्टोबर 17, 2012 येथे 1:15 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s