आज ५ ऑक्टोबर ब्लॉगवर पुन्हा लिहितो आहे, अनेक घटनांचा कालावधी गेला. सतरा भिंतींशी बोलल्याचे समाधान इथे लिहिण्यात आहे. कोण्या बोलत्या जीवाशी संवाद अजूनतरी जमलेला नाही. भिंतींना नको तितकी बोल ऐकण्याची क्षमता आहे. रेशमी जरतारी भिंत त्यातही जास्त घुसमटून टाकते, तो दृश्य स्तंभ मला खुणावतो; सामावून घेतो आणि माझे ऐकता ऐकता मला दृष्टीआड टाकून देतो. या भिंतींना माझ्यात अस्तित्त्व करून ठेवले आणि मी ठेवू दिले. 

मनाच्या पदराला गाठी आणि भरतकाम केलेली नक्षीसुद्धा आहे. तो पदर रेशमी जरतारीच आहे असे नाही; तो दृश्य स्तंभ आहे असेही नाही पण त्याचा आणि माझा असा एकमेकांमधला एकमेकांचा पाठलाग चालू आहे.

तोडक्या मोडक्या संबंधाना जरुरीहून अधिक स्थिरस्थावर करावयाचा सायास करतो- पण जरुरी किती आहे हाच प्रश्न आहे. मनातलाच आहे.. 

यावर आपले मत नोंदवा