वैयर्थ जेथे उमगे सदा…

निरतिशय प्रेमाखातर..

फ़ैजसाहबांची मनस्थिती कशी होती त्याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न. मनस्थिती निरनिराळ्या वेळी त्या अनुषंगे असू शकते. कवीची तर नक्कीच असते.

माझी त्याच्याशी ओळख झाली ती गदगदत्या अंत:करणाला हसरे रोपटे द्यावे त्याप्रमाणे..

इच्छांचा कल्लोळ उठला पहिल्यांदा त्याच्या नजरेत निरखलं तेव्हा, लोटून दिलं त्याच्या खोल दरीत तेव्हाच. 

असो. मी शब्दश: भाषांतर केलंय. आणि वेळीच न उमजणारे शब्द ही लावलेत. हे भाषांतर करण्या अगोदरच मी एकाला खो दिला होता. त्याचे आभार. आणि त्याच्या वतीने आणि माझ्याकडून याच कवितेचे भाषांतरचा खो aativas, जास्वंदी, गुरुदत्त यांना.

मेघना मनापासून धन्यवाद.

मूळ कविता-
तुम मेरे पास रहो
मेरे क़ातिल, मेरे दिलदार, मेरे पास रहो
जिस घड़ी रात चले
आसमानों का लहू पी के सियह रात चले
मर्हमे-मुश्क लिए नश्तरे-अल्मास लिए
बैन करती हुई, हँसती हुई, गाती निकले
दर्द की कासनी पाज़ेब बजाती निकले
जिस घड़ी सीनों में डूबते हुए दिल
आस्तीनों में निहाँ हाथों की रह तकने लगें आस लिए
और बच्चों के बिलखने की तरह क़ुलक़ुले-मय
बहर-ए-नासूदगी मचले तो मनाए न मने
जब कोई बात बनाए न बने
जब न कोई बात चले
जिस घड़ी रात चले
जिस घड़ी मातमी, सुनसान, सियह रात चले
पास रहो
मेरे क़ातिल, मेरे दिलदार, मेरे पास रहो
– फ़ैज अहमद फ़ैज
माझा प्रयत्न –
इथे रहावंस
माझे हृदय पोखरणारा, हृद्य इथे रहावंस
अंधार दाटून येतो तेव्हा
अवकाशातले सत्त्व गरगटून काळीभोर रात्र समोर
उलवणारा गंध घेऊन ही तिक्ष्णारे माणिक घेऊन
उंडारत आनंदाने, हसण्याने, गाण्याने निघालेली
सलाने कलुषित पैंजण हिंकाळत निघालेली
ज्या वेळी गर्तात हरवलेली हृदयांची जोडी
दोन्ही बाह्या त्यात येणारी त्याच हातांची वाट पाहण्या येऊ लागलीत..
बाह्या सरसावून..
मग मुलांच्या किंकाळ्या त्याच कि दारू भट्टीत दारू कलकलणारी
जीवाची काहिली नाचू लागली तरी शोक आवरावा वा विरावा
जे घडे ते घडेनासे वाटे
जिथे काहीच चालेनासे होते
अंधार दाटून येतो तेव्हा
ज्या वेळी शोकमय शुकशुकाट काळीभोर रात्र अंगावर चढे
इथे यावंस न् रहावंस
माझ्या फितूर खुशामत्या, हृद्य जीवा तू इथे राहावं .
Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s