वैयर्थ जेथे उमगे सदा…

विलोभनीय 

 “नाहीच कुणी अपुलें रे, प्राणावर नभ धरणारें 

दिक्काल धुक्याच्या वेळीं हृदयाला स्पंदविणारें” 

काहींना मरणाचे हुंदके येतात आणि त्यांना न्याय देणारे पण काहीजण असतात. आजच्या सोयीनुसार आपण मागे राहिलेलो ते काळाच्या पटलावर नोंदवून ठेवतो एवढंच.

अर्जुन भारद्वाज असो कि कौशल बाग आणि मागे ४ वर्षांआधीचं यशवंत कुलकर्णी या पत्रकाराचे स्वतःहून या जगातून निघून जाणे असो, सद्या मरण ओढावून घेणे हे एक समाजात धक्कातंत्र होत चालले आहे.

त्यांना मदत करणं आपल्या हाती नसतं आणि त्यांची दखल मात्र आपल्याला घ्यावी लागते, याहून अन्यायकारी आपल्या नीतिवान न्यायप्रिय समाजामध्ये असणार तरी काय, आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा आहे, पण आत्महत्या पूर्ण केलेल्या माणसाला शिक्षा आपल्या जगात नाही.

तिन्हीपैकी यशवंत जास्त अनुभवी, संवेदनाशील, आणि बाकी दोघांपैकी कौशल समाजाभिमुख प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आणि उरलेला अर्जुन म्हणजे नैराश्य आणि इतर कारणांनी ग्रासलेला पण लक्षाकृष्ट प्रवृत्तीचा, समान धागा नसणारे तिघे आत्महत्येच्या एकाच धाग्यात विणलेले, यशवंतने एकेक करत अंग काढले समाजापासून आणि तो निमाला, कौशलने समाजात राहून ऋण फेडून आपली ज्योत मावळली तर अर्जुनने समाजासमोर कलाकृती सादर करावी तशी योजना आखून पूर्ण केली.

त्या कृतींवर आता आक्षेप घेण्यात काही अर्थ नाही, त्यांना निसर्गाने मरण देऊ केले होते आणि ते त्यांनी यशस्वीरित्या हाताळले, जसे आत्मघातकी दहशतवादींना त्यांचे म्होरके मरणासाठी यशस्वीरित्या पाठवतात. अमानवी शक्ती अस्तित्वात नाही हे म्हणणे आता फोल ठरले आहे, आपले मनच जर आपल्या नियंत्रणात नसेल तर अमानवी शक्तिच्या हस्तक्षेपाशिवाय आपले जीवन पूर्णतः मानवी कृतींमुळेच भरून राहते, हे आता नक्कीच खोटे ठरत आहे. त्या मनावर बाहेरून येणारे प्रभाव आणि इतर गोष्टि इतक्या तीव्रतेने आदळत असतील तर आंतरिक अमानवी शक्ती आपला प्रभाव दाखवायला सुरूवात करते, and it’s just happened.

आपला एकमेकांवर प्रभाव असतो आणि आपण त्याची एक अनोखी वैयक्तिक लय मनातून जोडत असतो त्या अमानवी शक्तीपर्यंत. तिथपर्यंत आपण सुकर प्रवास केला तर आपण जगत असतो, पण त्या ठिकाणी काही कारणांनी आपली लय तुटली जात असेल तर आपण हतबल होतो आणि बाहेरून येणाऱ्या प्रभावांचा भपकारा गुंडाळतो आणि एकदाचे स्वतःला संपवतो.

अश्या वेळेस संपवण्याच्या मार्गाला लागणारे; डोंगरांना कडे असतात, झऱ्यांना त्यांवरून कोसळत जाणे असते, त्याप्रकारे तसे परत न फिरणारे पांथस्थ बनतात आणि उज्ज्वल प्रकाशाचा वेध घेत निघून जातात.

समाधीत असतांनाची स्थिती अशीच आहे, नंतर देह परत ताब्यात येतो पण आत्महत्या तर शरीरावरसुद्धा पाणी सोडते. आणखी अश्यांना आपल्यातलं अस्तित्व-ममत्व, जवळीक आणि दुरावा एकाचवेळी नष्ट करायचं असतं आणि मग ती जिथे सागरा धरणी मिळते अश्या अनुभवाला आपलेसे करतात.

त्यांना वाटलेले त्या पलीकडचे अनुभव आपल्याला कधी अभ्यासाला येणार नाहीत, पण आपण केवळ त्यांची पूर्वपीठिका समजून घेण्याचा प्रयत्न करूया तरी, उरलाच वेळ जर आपल्याला…

उद्याचं तर आपलंच आपल्याला माहित नसतं….

 

Advertisements

One response

  1. अजय Battulwar

    अप्रतिम आहे

    जून 15, 2017 येथे 1:58 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s