वैयर्थ जेथे उमगे सदा…

अक्षय्य तेथवर..

अक्षय्य तृतीया भर वैशाखातला सण, त्यावर अनेक लोकप्रचलित कथा आहेत.

एकदा एक नावाडी आपल्या नावेत बसून नदी ओलांडत असतो. त्याच्या नावेत जलसंपदा पुरेपूर भरलेली असते. काही प्रवाशीसुद्धा असतात, आणि तेव्हा एक मासा त्याला ओरडून म्हणतो कि, एवढ्या रणरणत्या उन्हात जर तुझ्याकडे घोटभर पाणी असेल तर मला देशील का, हे ऐकून नावाडी माश्याला जाळ्यात अडकवून आपल्या संपदेत आणखीन भर घालतो. दिवेलागणीला नावाडी परत येत असतांना गार वारा सुटलेला असतो सोबत काही गावात परतणारेसुद्धा असतात आणि तेव्हा एक मेंढी आपल्या आवाजात नावाड्याला बोलते कि, एवढ्या गार वाऱ्यात जर तुझ्याकडे घोंगडं असेल तर मला देतोस का, त्यावर हसत हसत आपलं घोंगडं एका बाजूला सारत नावाडी ओलीचिंब जाळी तिच्यावर भिरकावून लावतो. 

जेव्हा तो घराजवळ पोहचतो तर तेव्हा दारावर देव आलेला दिसतो, त्यामुळे त्याला आनंद होतो आणि देवाला घरात येण्याची विनंती करतो पण देव त्याला थांबवत म्हणतो मला जर अक्षय्य दान दिलंस तरच मी तुझ्या घरात प्रवेश करेन, तेव्हा नावाडी आपलं घोंगडं देवावर लपेटतो आणि आपल्याजवळचे उरलेले घोटभर पाणी देवाला पाजतो. असं सारं करत असतांना आज दिवसभरात घडलेल्या चमत्कारिक घटना देवाला सांगतो आणि आपण केलेल्या दोन निष्पाप जीवांशी थट्टा कबूल करतो. 

देव यामुळे शांत होतो खरा, पण तरी तो म्हणतो आज मला अक्षय्य दान हवं, त्यावर नावाड्याला काहीच उमगत नाही. तेव्हा तो हिरमुसून देवालाच म्हणतो कि तुम्हीच सांगा काय देऊ दान कि जे अक्षय्य असेल, देव त्याला सांगतो, “धर्म दे, मासा पाण्यात राहून पाणी मागतो, मेंढी स्वतःला स्वसंरक्षण असून घोंगडं मागते, त्याचरितीने माझं चैतन्य ज्यात आहे तो धर्म तू मला दे. आपले स्वत्व हेच अक्षय असते आणि तेच स्वत्व इतरांकडून मागत राहणे हा आपला धर्म, तू माणूस आहेस आणि तुझं स्वत्व तुझ्या विचार-विवेक-चिंतनशीलतेत आणि प्रेमाच्या अभिव्यक्तीत आहे, ते तू सतत इतरांना मागणं हा तुझा धर्म, आणि तो तू आज मला अक्षय्य दान म्हणून पुरवावंस.”

Advertisements

2 responses

 1. अजय Battulwar

  छान कथा आहे धर्माचा खरा अर्थ सांगितलं आहे

  जून 15, 2017 येथे 1:52 सकाळी

 2. समीर शा

  Farach sunder dada
  Farach sunder….

  नोव्हेंबर 29, 2017 येथे 1:18 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s