वैयर्थ जेथे उमगे सदा…

जिव्हाळघरटी

मनाच्या काचेवर कापसासारखे आपले बालपण ठेवले तर ते भुर्र उडू नयेच वाटते, हसरे मन लेऊन जन्मतो आपण प्रत्येक जण मात्र ते इथून हरवून द्यायला..

पण नेहमी रडतोसुद्धा आपण तरी दिवसेंदिवस लागतात आपले हसू विरायला, पहिला दिवस खळाळून जातो हसण्या-रडण्यात, नंतर नंतर तर हसण्याला स्मृतीभ्रंश होतो आणि रडण्याला पेव फुटते.

नातं व्हावं कसं.. जराही उत्तम नको, तर मनावर काच ठेवून दिसत राहिलं नुसतं जरी निखळ..

ते नको नातं ज्यात नावाचे रकाने भरावेत, वंशाची जबाबदारी घेत.

छंदबद्ध तारे खुणावत राहावेत नात्यात, फुलांचा देठापर्यंतचा मागोसा जाणवत-घेत-शेवटत.

हसू आवरत न-आवरत जीवन सरावे, पक्ष्यांच्या साद घालतांनाच्या समयीं; आपला जीव न्यावा त्यांनी आपल्या घरट्यातल्या पिल्ल्यांना आपल्याच नात्याच्या गोष्टी सांगत.

*जिव्हाळघरटी – जी.एं.नी सुनीताबाईंना आपल्या पत्रातून दिलेली शब्दभेट

Advertisements

One response

  1. अजय Battulwar

    सुरेख शब्दांकन

    जून 15, 2017 येथे 1:48 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s