वैयर्थ जेथे उमगे सदा…

ताज्या

हळदिवें

रोजचे क्षण शिंपडून घातले मनावर अखेर…शपथ घालत..

असेच सारे थोपवणारे धपापत एकच स्वर राहिला…सूरनश्वरसा..

शर्यत ठार वेडसर बनवत-बनत जाण्याची…छद्मी विरह हा…

नदीशी तो ऊर-अनुभव रूतून जाऊ दे शांत प्रवाहाने… जराच..

जागोजागी मोकळे दिसेनासे होते…अंधारकल्लोळ तो.. रात्रीचा नदीवर..

लाल किनार धरून मग निळ्या रस्त्यावर जाते मन…रेषा अजूनच अजूनही.. प्रवाहावरच्या..

तीक्ष्ण उतरून नंतर इथे येते प्रवाहाशी मन अलगद हळदिवें होऊन तरळणारे दूरवर…मायेचे..आदिम 

*हळदिवें – आरती प्रभूंची कवितेतली शब्दकळा

Advertisements