धेडगुजरी शाम

धेडगुजरी या शब्दाचा अर्थ मला तसा माहित आहे आणि नाहीही… तसंही त्या अर्थाचा मला उहापोह बिलकुल करायचा नाही, मला माझं मन मोकळ करता आलं पाहिजे..

तर होता होता माझा अभ्यास बराचसा रुळावरून खाली उतरत होतोय.. आणि त्यात संध्याकाळी मला भलताच उत्साह भरून येतो, कशाने काय माहित.. अभ्यास करण्याचा नाही अर्थात..; इतर गोष्टी करण्यासाठी… मग मी हे बरोबर म्हणतोय नं ‘ धेडगुजरी शाम.. सारे काम तमाम.. ‘

मागच्या लिहिलेल्या पोस्ट वाचत बसलो होतो, आणि यांत वेळ का चालला आहे.. असा विचार करून मी ही पोस्ट लिहायला लागलो. आपण नॉस्तलजिक होण्यात खूप धन्यता मानतो..आता हेच पहा नं मी काय तर इथे माझ्या अभ्यासाच्या दुखापती लिहित बसलो, आणि परत ते वाचण्यात मला वेळ घालवायला बर वाटतंय.. म्हणजे अभ्यास राहिला दूर आणि मीही जातोय अभ्यासापासून दूर.. असो..

आजचा वृत्तांत इतकाच..

यावर आपले मत नोंदवा