कोंडाळे फोडणे वगैरे वगैरे भाग-२

गरम रक्त गळचेपून गेलंय, खरं तर. एक क्षण विसावला आणि हेच इथे लिहावे म्हणून,

या कोंडाळे फोडण्यावर मी लिहतोय त्याला कारण माझ्या वयाच्या माणसांचे तिथल्या तिथे गिरक्या घेणारं जगणं चालू आहे. आपले डोके या खोक्यासमोर टांगून टांगून जीवाची त्यांनी भाजणी केली आहे. मी तेही करू पाहतो आहे पण हाकून पिटून जाणारी दशा मला कुठेतरी पहायची आहे. सरळ सुत चालू आहे.

आतंकवाद घडायला हवा आहे.

कोरा माणूस कडेला पाहत हल्ली कोराच असतो. गूढ खदखदत नसतात त्याची आत शांत. दोर तुटावा तसा माणूस जग सोडून जातो, ती उणीव जाणीवेहून जास्त काही नसते. खिळखिळणारी मृत्युशय्या हवी असते अजून तरी मला. तिरके तिरके पाहत मन मोडावीच का असा प्रश्न कित्येक दिवसात आला नाही. तीव्र ठसलेली संस्कृती मला कापत जाते तीक्ष्ण वेगात, अरे कुठे जायचं आहे सर्व हे सर्व करून; नकोसे होते सर्व. आदिम असणे पहिलं अगदी पहिलं असायला हवं किंवा काही नसणे हे मला अधिक प्रिय होत आहे. शिवाचा थयथयाट थंडावा देणारा वाटतोच नाश करत करत सर्वांचा. चिमणीच्या चिवचिवाटात चिर्र चिर्र भिजून भाजून गेलोत असे वाटते. नाजूक स्पंदने आणि नाजूक कोवळी नाजूक शब्द दूर फेकाटून द्यावे वाटतात. कचरा खात रहावा तृप्त होवोस्तोवर त्यात मरण आकंठ येऊन जाऊ द्यायचं आहे एकदा मला. मन मन मन फुफाट सोडून उधळून देऊ द्यायचं आहे. निशाण ठेवतही राहत जायचं नाही मला कुठे. समुद्रात बेमालूम मिसळून जायचं आहे, तीव्र तीक्ष्ण एखाद्या संस्कृतीसारखं.

यावर आपले मत नोंदवा