स्मरता का…

दरवळून येतात काही आठवणी..
जरा जीभेवर रेंगाळणार्‍या गोड…
पावसाच्या भिजभिजलेल्या काही अश्या….
आणि शहार्‍याने अंग उलणार्‍या ऊरभेटी..
प्राजक्ताच्या नाजुकश्या फुलांना ओंजळीत साठवणार्‍या आठवणी काही..
चंद्राच्या कोरीवर भरला चांदवा जसा..
स्मरता का..
पानोळीत दडलेल्या आणि बेबंद केसांत गुंतलेल्या…
कालच्या परवाच्या आठवणी…
पाहताना दिसताश्या आठवणी..
विरलेल्या, स्वप्नांतल्या आठवणी….
तुझ्या आणि तुझ्याच…आठवणी स्मरता का….
स्मरतात ना..गोड..

यावर आपले मत नोंदवा